
हिमायतनगर। स्त्री शिक्षणासाठी उभे आयुष्य वाचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात माळी समाज बांधवांच्या वतीने श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचद श्रीश्रीमाळ यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
सुरुवातीला येथील सभागृहात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर सभागृहात जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश गडपाळे, तुकाराम अडबलवाड गुरुजी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्र व समाजासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, अनंतराव देवकते, अनिल मादासवार, विलास वानखेडे, संजय माने, विठ्ठलराव फुलके, बाजार समितीचे संचालक सुभाष शिंदे, रामराव सुर्यवंशी, दता काळे, सदानंद ढगे, मारोतराव हेद्रे, सचिव मायबा होळकर, परमेश्वर वानखेडे, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रताप लोकडे, संदिप तुप्तेवार, वाघमारे सर, भारत डाके, दळवी पाटील, श्री मुनेश्वर, पापा पार्डीकर, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जयंती कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन सुभाष शिंदे यांनी केलं तर उपस्थित सर्वांच आभार मायबा होळकर यांनी मानले.
