महाराष्ट्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे होणार उद्घाटन

नवी दिल्ली| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांशी संवाद साधतील.

यावर्षीराष्ट्रीय युवा दिन विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने देशातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. या मोहिमेत 88,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट्सनेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस) आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या पाठिंब्याने देशभरातील माय भारत’ स्वयंसेवकभारतासाठी स्वयंसेवक म्हणून उपक्रम राबविण्यासाठी त्यांची ऊर्जा एकवटतील.

12 जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरे आणि 750 जिल्हा मुख्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षित रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांना केंद्र/राज्य मंत्रीस्थानिक खासदार किंवा आमदार यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवूनव्यापक मोहिमेद्वारे उद्याची सुरक्षितता निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शविली जाईल. हे स्वयंसेवक वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक हाताळण्यात मदत करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी तैनात केले जातील.

कार्यक्रमात सहभागी मंत्रालये आणि त्यांची जिल्हास्तरीय कार्यालये 12 जानेवारी 2024 रोजी विविध प्रदर्शने/उपक्रम/नोंदणी/जागरुकता मोहिमेसाठी स्टॉल उभारतील. तसेच वाहतूक जागरूकतापोषण आणि आहारकेव्हीआयसी स्टार्टअप्सची उत्पादनेपीएमईजीपी  लाभार्थी इ. मुद्द्यांवर यावेळी भर दिला जाईल. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन डिजिटल माय भारत व्यासपीठावर जिल्हास्तरावर तयार केले जात आहेतजेणेकरुन जास्तीतजास्त युवकांपर्यंत पोहोचता येईल. प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आणि युवा आकांक्षा व्यापकस्तरावरील उपक्रमांमधून प्रतिबिंबित व्हावेतया उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने दिली आहे.  या उपक्रमात नोंदणीसाठी माय भारत डिजिटल प्लॅटफॉर्म (https://mybharat.gov.inद्वारे स्वयंसेवकांची नोंदणी केली जाईल.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!