नांदेड| भाग्यनगर पोस्टे येथे गुरन 436 / 2023 कलम 392, 34 भादवि दिनांक 08.11.2023 रोजी दाखल झाला असुन, सदर गुन्हयात तपास कामी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपीचा शोध घेतला असता मालेगाव रोडकडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दोन अनोळखी इसमास बुलेट मोटार सायकलवरून संशयीतरित्या ताब्यात घेतले आहे. त्यांचे नाव तौफिकखान पि. आयुबखान, वय 24 वर्षे, रा. बिलालनगर देगलुर नाका नांदेड आणि सलमानखान पि. असलमखान, वय 28 वर्षे, रा. अदनान गार्डन धनेगाव यांना ताब्यात घेवुन तपास केला असता पोस्टे भाग्यनगर हदीमध्ये वेगवेगळे सहा गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे अंतर्गत गुरन 431 / 2023 कलम 307, 394, 397,34 भादवि.,गुरन 435 / 2023 कलम 392, 34 भादवि, गुरन 436 / 2023 कलम 392, 34 भादवि, गुरन 437 / 2023 कलम 392, 34 भादवि, गुरन 335/2023 कलम 392, 34 भादवि, पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 798 / 2023 कलम 392, 34 भादवि इत्यादी गुन्हे करणारे आरोपीच्या शोधात पोलीस पथक फिरत होते. दरम्यान मालेगाव रोडकडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दोन अनोळखी इसमास बुलेट मोटार सायकलवरून जाणार्यात ताब्यात घेतले. याना विचारपूस केली असता त्यांनी केल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्हयात वापरण्यात आलेल्या दोन्ही मोटार सायकली बुलेट बोधन तेलंगना येथुन चोरल्याचे सांगीतले आहे. तसेच एक शाईन मोटार सायकल हिंगोली येथुन चोरल्याचे सांगीतले. तसेच त्याचे कडुन 49 ग्रॅम सोने अंदाजे किंमत 1.50,000/- किंमतीचे व दोन मोटार सायकली तीन लाख रुपये किंमतीचे असे एकुण 4,50,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन तपास सुरू आहे.
सदरची कामगीरी सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली, आविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, खंडराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, जगदीश भंडरवार, पोनि स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली सुर्यमोहन बोलमवाड, पोनि सुनिल भिसे, पोउपनि पोहेको दिलीप राठोड, गजानन किडे, प्रदीप गर्दनमारे कळके, पोकों हाणमंता कदम, ओमप्रकाश कवडे यांनी कामगीरी केलेली आहे.