धर्म-अध्यात्मनांदेड

हिमायतनगर शहरात ढोल ताशांचा गजरात अक्षतांची मंगल कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत

हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेला रथ…ढोल ताशांचा गजरात….’जय श्रीराम’ चा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांची मंगल कलश यात्रा हिमायतनगर शहरात दखल होताच स्वागत करण्यात आले. मुख्य स्वागत कमानीपासून भव्य शोभा यात्रा ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी डोक्यावर अक्षता कलश घेऊन येथील श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. येथे तीन दिवस शहरवासीयांना कलशाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच शहरातील घराघरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या निमंत्रण अक्षदा प्रतिमेसह पोचविल्या जाणार असल्याची माहिती श्री शामजी रायेवार यांनी दिली आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या कलशातील अक्षता प्रत्येक रंभाकतच्या घरी पोचविण्यासाठी पाठविण्यात आल्या असून, विहिंपचे जिल्हा सहमंत्री संतोष रायेवार, किनवट तालुका मंत्री किरण ठाकरे हे श्रीराम मंदिर अक्षदा कलश यात्रेला घेऊन हिमायतनगरात दाखल झाले. यावेळी वाढोणा शहरात रथाचे आगमन होताच श्री परमेश्वर मंदिर येथे कलशांचे पूजन व यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आरती करून सदरील अक्षदा कलश श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच शहर व टालूक्यातील गावागावात अक्षदा, मंदिराची प्रतिमा आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिवशी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती या आवाहन पत्र वितरित केले जाणार आहे.

भगवान श्रीराम हे सगळ्यांचे आदर्श आहेत ते राष्ट्रनिर्माते आणि राष्ट्र जागरणाचे अखंड प्रेरणा स्रोत आहेत जोपर्यंत प्रभू श्रीरामाचा आदर्श आपण समोर ठेवतो आहोत. तोपर्यंत आपल्या देशाला आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला कोणीही धक्का लावू शकणार नाही. त्यामुळे अयोध्येत निर्माण होणारे मंदिर हे केवळ राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे. येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी विक्रम सावंत २०८० सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी प्रसभू श्रीरामाची नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. आपणही आपल्या परिसरातील मंदिरामध्ये या दिवशी दुपारी ११ ते १.३० या वेळेत श्रीरामाचे भजन, पूजन कीर्तन एलसीडी स्क्रीन लावून ती व्ही स्क्रीन लावून अयोध्येतील होणारा कार्यक्रमाचे प्रजक्षेपण करावे शंखध्वनी, घंटानाद आणि आरती करून प्रसादाचे वितरण कर्वे असे आवाहन या अक्षदा कलशाच्या स्वागत प्रसंगी वैष्णव हिंदू परिषदेचे श्यामजी रायेवार यांनी केले आहे.

यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, कमलाकर दिक्कतवार, सुधीर उत्तरवार, सोपान कोळगिर, ज्ञानेश्वर लीगमपल्ले, शिवम गाजेवार, निक्कू ठाकूर, जितू सेवनकर, रामभाऊ सूर्यवशी, विलास वानखेडे, ओंकार चार्लेवार, निलेश चटणे, श्री गुंडेवार, सुधाकर चिट्टेवार, शुभम नरवाडे, वैभव डांगे, अक्षय राहुलवाड, परमेश्वर नागेवाड, गणेश रामदिनवार, आकाश बास्टेवाड, विष्णू वानखेडे, शुभम जक्कलवाड, देवा चर्लेवार, पत्रकार अनिल भोरे, अनिल मादसवार आदींसह विश्व् हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!