नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत तिन हजार वृक्षारोपण करण्यात येणार असून ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिडको येथील जिजाऊ सृष्टी येथे वृक्षमित्र मोहनराव पाटील घोगरे,सामाजिक कार्यकर्ते,कर्मचारी, पत्रकार यांच्यासह सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका नांदेड यांच्या वतीने आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तिन हजार वृक्ष रोपण करण्याचे उदिष्ट असुन ५ जुन रोजी सिडको येथील जिजाऊ सृष्टी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी वंसुधरा शपथ घेण्यात आली या नंतर वृक्षारोपण करण्यात आले,यावेळी वृक्षमित्र मोहन पाटील घोगरे, संभाजी बिग्रेड चे संकेत पाटील,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार तिरूपती पाटील घोगरे,दिगांबर मुंडकर,निवृती रणबावळे, ज्ञानोबा नेरनाळे, बालाजी गजेवार,रेणुका बाई,नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिए शन नांदेडचे सचिव एकनाथ पाटील व मलखांबचे विध्यार्थी ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप कदम, विलास बिरादार,वसुली लिपिक मालू एनफळे,नथुराम चौरे, संदीप धोंगडे,संजय ढेंगळे,रवींद्र पवळे,जयराम सूर्यवंशी मारोती चव्हाण,शिंगे यांच्या सह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिजाऊ सृष्टी भागात विविध ठिकाणी तर सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनेक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार आहे.