हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी सूचना मांडून वृद्ध साहित्यीक कलावंत मानधन योजनेचे मानधन वाढविण्याची बहुजन टायगर युवा फोर्सची जाहिर मागणी

भोकर| आमदार भिमराव केराम यांना निवेदन देताना साहित्यीक कलाकारांचे मानधन वाढवून ५ ते १० हजार रुपये करा आमदाराकडे साकडे : कलावंतांकडून प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन नांदेड जिल्ह्यात लोककलेत मानाचे स्थान आणि मोठा जनाधार लोककलावंतांचा आहे. त्यांना श्रेणीनुसार दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करून ते किमान ५ ते १० हजार रुपये करावे. यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे आमदार भिमराव केराम यांनी लक्ष द्यावे आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी लोककलावंत जिल्हा बहुजन टायगर युवा फोर्स संघटनेतर्फे केली आहे.
किनवट चे आमदार भिमराव केराम यांची लोककला नांदेड जिल्हा बहुजन टायगर युवा फोर्स संघटनेच्या किनवट तालुका शाखेच्या शिष्टमंडळाच्यावतीने किनवट येथील आमदार केराम यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली त्यावेळी शाहिर त्रिरत्नकुमार मा.भवरे संस्थापक अध्यक्ष बहुजन टायगर युवा फोर्स, महाराष्ट्र राज्य ,शाहिर किशन ठमके तालूका अध्यक्ष बहुजन टायगर युवा फोर्स नांदेड ,शाहिर केशवराव हरी केंद्रे ,शाहिर नरेद्र रामजी दोराटे जिल्हाध्यक्ष बहुजन टायगर युवा फोर्स नांदेड ,हिरामण ,शाहिर ह.भ.प. हिरामन बळीराम जाधव अध्यक्ष पारंपारीक शाहिर लोक कलावंत संवर्धन मंडळ ता.शा.किनवट आदी उपस्थित होते जिल्ह्यातील कलावंतांच्या दुर्लक्षित राहिलेल्या मागण्या आमदार केराम यांच्यामुळे मार्गी लागतील अशी अशा कलावंताना आहे.
आमदार भिमराव केराम यांचे आश्वासन
नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील कलावंतांचे प्रस्ताव उशिरा पोहचल्यामुळे मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. ते प्रस्ताव शासनाकडून तातडीने मंजुर केले जावेत. त्याचबरोबर राज्य शासनाकडून नवनवीन लागू होणाऱ्या योजनांचे परिपत्रक संघटनेला देखील मिळावे अशा मागण्याचे निवेदन आमदार भिमराव केराम यांना देण्यात आले आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार केराम यांनी बहुजन टायगर युवा फोर्स च्या शिष्टमंडळाला दिले.
