नांदेडलाईफस्टाईल

येरगी ग्रामस्थांनी घेतला गाव स्वच्छ ठेवण्‍याचा संकल्‍प; स्वच्छतेसाठी एकवटला गाव

नांदेड| देगलुर तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या येरगी गावात स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत काल रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली. यात शाळकरी विद्यार्थी, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येरगीच्या या स्वच्छता अभियानात पहिल्यांदाच गावकरी स्वेच्छेने मोठ्या संख्येने सामील झाले होते.

गावातील या स्वच्छता अभियानात गावचे सरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सहभागी महिला व पुरुषांना मास्क व हॅन्ड ग्लोज चे वाटप करण्यात आले. स्वच्छता अभियानाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थितांनी हातात झाडू घेऊन गावातील सर्व रस्ते शाळा, मंदिराचा परिसर, ग्रामपंचायत परिसर, आरोग्य उपकेंद्र, ऐतिहासिक चालुक्य कालीन बारवाची स्वच्छता केली. स्वच्छता दरम्यानचा कचरा लगेच घंटागाडीतून गावाबाहेरील खड्ड्यात टाकण्यात आला. स्वच्छता अभियानात स्वच्छतेच्या संदेश देणाऱ्या गीतांचे प्रसारण करत स्वच्छता करण्यात आली यामध्ये गावकरी पुरुष यांच्याबरोबर शाळकरी विद्यार्थी, यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

यापुढे गावात दर रविवारी सर्व गावकरी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला. तसेच ग्रामपंचायतीकडून दररोज गावात कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी पाठवण्यात येणार आहे. चालुक्य नगरीच्या गावकऱ्यांनी दारू बंदी नंतर स्वच्छतेचा वसा हाती घेतल्याने सर्वत्र या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!