नांदेड। रथसप्तमी निमित्त विद्यालय- महाविद्यालयात पतंजली तर्फे सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे,रथसप्तमी सूर्याच्या जन्माचे प्रतीक असून या दिवशी सूर्य जयंतीच्या स्वरूपात रथसप्तमी साजरी केली जाते.
शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी पतंजली योग परिवारातर्फे विद्यालय, महाविद्याल, वस्तीग्रह ठिकाणी योग शिक्षकाद्वारे सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात येत आहे. सूर्यनमस्कार सहसा बारा स्टेप्स मध्ये काढले जातो. सात योगासनाचा समावेश असून पाच आसने रिपीट होतात. त्या असण्याची नावे प्रणामासम, हस्त उत्तानासन, हस्त पादासन, अश्वसंचलनासन, पर्वतासन, अष्टांगासन, भुजंगासन मग रिपीट होतात पर्वतासन, अश्वसंचलनासन, हस्त पादासन, हस्त उत्तानासन व प्रणामासम.
बारा आसने करताना प्रत्येक आसनासोबत सूर्याची उपासना सूर्याची विविध नावे घेऊन केली जाते, जसे ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगय नमः, ओम पुष्णेय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रेय नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः
जिल्हा तिल सर्व योग शिक्षक योगसाधक व पतंजली परिवारातील कार्यकर्त्यांना आपल्या परिसरातील शाळा, विद्यालय, महाविद्यालय व वसतिगृह जाऊन सूर्यनमस्काराचे आयोजन करावे असे जिल्हा समिती आव्हान करत आहे. सूर्यनमस्काराने सर्व अवयवांना सर्वांगीण व्यायाम मिळतो. मुलांना हे गरजेचे आहे. ही काळाची गरज आहे.