आ.हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त 14 लाख रुपयांचा औषधी साठा शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द
नांदेड। नांदेड दक्षणिचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी जमा केेलेली सुमारे 14 लाख रुपयांची अत्यावश्यक औषधी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार घेणार्या रुग्णांसाठी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आपल्या आवाहना प्रतिसाद देवून कार्यकर्त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी लाखो रुपयांची औषधी देवून मोलाचा वाटा उचलला आहे, कार्यकर्त्यांसह रुग्णांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पूर राहू, अशा भावना आ. मोहनराव हंबर्डे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
23 मे रोजी आ. मोहनराव हंबर्डे यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी त्यांनी आपल्यासाठी हारतुरे, पुष्पगुच्छ आणण्याऐवजी रुग्णांसाठी आवश्यक लागणारी औषधी आणावीत, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे नांदेड दक्षिण मतदारसंघात जोरदार स्वागत होत आहे. आ. हंबर्डे परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत हा औषधी साठा रुग्णालयीन प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
या सेवेसाठी खासदार वसंतराव चव्हाण,पवन सारडा,नरेश परमाणी. रमेश पाटणी ,धीरज मुत्ता. राहुल मोगडपल्ली ,उमेश परमाणी.
,मधुकर दिघे,बालाजी पाटील काकांडीकर. भारत ग्रुप नवल गुप्ता गोविंद सोमानी रिजवान कुरेशी,अब्दुल मुखिद,असलम पठाण
,प्रशांत हंबर्डे,मोहम्मद मुजफरोद्दिन,विजय रिजवानी ,प्रकाश रिजवानी, प्रफुल कदम .राम कल्याणी, सुनील आनंतवार अजय एडके,डॉ.कालिदास मोरे, ताहेर सिद्दिकी,नाविद सिद्दिकी ,बाळू बोंढारकर. सुनील सिंगल,पंजाबराव देशमुख,विजय टेकाळे दिगंबर करडिले,बाबुभाई खोके वाले.डॉ.पवार. आर.वाय,भोसले,जी.बी. देशमुख,साईनाथ यादव मित्र मंडळ,फतेपुर ग्रामपंचायत. हरीश हंबर्डे,कैलास कल्याणे, सुधीर हंबर्डे. धर्मदरसिंघ शिलेदार,रमेश नांदेडकर, गोविंदराव जामगे. सुमेध एडके,प्रमोद हंबर्डे विनायक हंबर्डे आदींचे योगदान लाभले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख,वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाय. एच.चव्हाण, डॉ. जे बी देशमुख,डॉ.शाम वाकोडे, डॉ.शिरीष दूल्हेवाड,डॉ. कपिल मोरे,मेडिसिन स्टोर इन्चार्ज नरेश टोके, फार्मासिस्ट रमेश दुधंबे, नर्सिंग हंबर्डे,राहुल हंबर्डे, जयसिंग हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे,शिवराम लुटे, राजेश हंबर्डे,शिवप्रसाद कुबडे,शेख एजाज, राहुल सोमवंशी, संतोष हंबर्डे,मधुकर काळे यांच्यासह कार्यकर्ते व इतर रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.