धर्म-अध्यात्मनांदेड

Important meeting ; महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ६ एप्रिलला नांदेड येथे महत्वपूर्ण बैठक

नांदेड। क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची ८९४ वी जयंती निमित्त पूर्व नियोजन बैठक रविवार दिनांक ६ एप्रिल सकाळी ११ ते ३ या वेळेत शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी शिवा संघटनेच्या वतीने याहि वर्षी मोठ्या जल्लोषात जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्य कार्यक्रमाच्या पुर्वनियोजनाची बैठक शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्टीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. विठ्लराव ताकबिडे, वैजनाथ तोनसुरे, संजय कोठाळे, संतोषराव शेटकर, वीरभद्र बसापूरे, दिगंबर मांजरमकर, डॉ वैजनाथ हंगरगे, इंजी. अनिल माळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजीत केली आहे. अशी माहिती कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस शिवकुमार देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सदर बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, शंकर पत्रे, रविंद्र पांडागळे, संभाजी पावडे, सिद्धेश्वर स्वामी जवळेकर, नंदुआप्पा देवणे, शुभम घोडके, संग्रामजी काडवदे, गजानन कानडे, शिवराज उमाटे, विजय हिंगमीरे, सतीश मठपती, नंदाताई पाटील, सत्यभामा येजगे, सविता निमडगे आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!