ओबीसीच्या आरक्षणातील आरक्षण इतर समाजाला देवू नये – डाॅ. बी.डी. चव्हाण

हिमायतनगर,परमेश्वर काळे। ओबीसीला संखेनुसार 32 टक्के आरक्षण मिळावे, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा. केंद्रात लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण जाहिर केले परंतू ओबीसी महिलांचे आरक्षणातील आरक्षण 27 टक्के जाहिर करणे आवश्यक होते ते केले नाही. सरकारने ओबीसीच्या आरक्षणातील आरक्षण इतर समाजाला देवू नये तसे झाल्यास महाराष्र्टात ओबीसी रस्त्यावर उतरेल असा इशारा डाॅ. बी.डी. चव्हाण यांनी हिमायतनगर येथील ओबीसी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिला आहे.
हिमायतनगर महात्मा फुले सभागृहात तालुक्यातील ओबीसी समाजाची बैठक संपन्न झाली. यावेळी ओबीसी नेते प्रकाश राठोड, ओबीसी मराठवाडा नेते डाॅ.बी.डी. चव्हाण, ओबीसी राष्र्टीय नेते सचिन नाईक आदीसह उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार सुभाष शिंदे, मोहन नाईक, नारायण देवकते, पर्वत काईतवाड, गजानन गोपेवाड, गुलाब राठोड, पवन करेवाड आदीने केले. या बैठकीचे प्रस्ताविक ओबीसी ता. अध्यक्ष बाबाराव जरगेवाड यांनी केले. डाॅ. दामोधर राठोड , अशोक अनगुलवार, दिलीप राठोड, ओबीसी नेते प्रकाश राठोड यांनी विचार मांडले.
या ओबीसी बैठकीला राष्र्टीय नेते सचिन नाईक म्हणाले. ओबीसी डाटा चूकीच्या पद्धतीने घेवून वाटा देत आहेत. ओबीसी मध्ये ABCD प्रवर्गात विभागणी केली तर ओबीसीतील 345 जातीवर अन्याय होणारा आहे. ओबीसी मध्ये संपन्न समाजाचा समावेश केला तर मूळ ओबीसीवर अन्याय होईल. ओबीसी नेत्यांना ताकद दाखवावी लागेल. ओबीसीला संविधानिक आरक्षण मिळणे आवश्यक आहे. एस्सी,एसटीला संविधान कळाले परंतू डाॅ. बाबासाहेबांनी ओबीसीला दिलेले आरक्षण समजले नाही. त्यासाठी ओबीसी वर्गानी घटना समजली पाहिजे, असे सचिन नाईक म्हणाले. बैठकीला उपस्थित झालेल्याचं अभार दिनेश राठोड यांनि मांडले. या प्रसंगी बापुराव बोड्डेवार, सुभाष शिंदे, डाॅ. दामोधर राठोड, राम नरवाडे, राम राठोड, दिनेश राठोड. अनिल नाईक ,आनंद मुतनेपाड, लक्ष्मण जाधव, अशोक अनगुलवार, नागेश शिंदे , दिनेश राठोड, सह तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संखेने होते.
