
नांदेड| राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीअडचणी, त्यांच्या विकासाचे धोरण, सध्याची राजकीय परिस्थिती तसेच इतर विषयावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने प्रदेश कार्यकारीणी,सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्ष,अॕट्रासिटीज अॕक्ट समन्वयक, महीला विभाग या सर्वासाठी दिनांक १ व २ आक्टोबर रोजी शिर्डी येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती काँग्रेस अनुसूचीत जाती विभागांचे प्रदेशाध्यक्ष डाॕ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील हॉटेल साई पालखी निवारा येथे होत असलेल्या “संविधान के राह पर” या प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी अ.भा.काँग्रेस सचिव मुकुल वासनिक, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटीया , एस सी, एस टी व अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के.राजु, माजी मुख्यमंत्री व CWC सदस्य अशोकराव चव्हाण,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात व राज्यातील प्रमुख नेते मंडळी तसेच विविध विषयात तज्ञ मार्गदर्शक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचीत जाती तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी रवाना होत असून दिनांक २ रोजी शिर्डी येथील हॉटेल साई पालखी निवारा येथे सकाळी 8 वाजता नोंदणी, ओळखपत्रे व नाष्टा त्यानंतर ठीक 9 वाजता प्रशिक्षण शिबिर सुरू होणार असल्याची माहिती नांदेड काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. मनोहर पवार व प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल सावंत यांनी दिले आहे.
