क्रीडा

नाशिक जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

नाशिक। टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षा आतील टेनिस क्रिकेट अजिंक्य स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी ,महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड सहसचिव धनंजय लोखंडे ,विलास गिरी, व क्रीडा शिक्षका योगिता महाजन व प्रतिक्षा कोटकर इत्यादी उपस्थित होते नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 63 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी निफाड, नाशिक ,दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, या तालुक्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक :-के के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल काकासाहेब नगर ,द्वितीय क्रमांक क्रीडा सह्याद्री निफाड, तृतीय क्रमांक /-ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक व मुलींमध्ये प्रथम क्रमांक : सरस्वती विद्यालय निफाड ,द्वितीय क्रमांक /-के के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल काकासाहेब नगर तृतीय क्रमांक/- स्पिरिट स्पोर्ट अकॅडमी नाशिक यांनी मिळाल्याबद्दल यांचे अभिनंदन होत आहे .

या निवडचाचणीतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू 8 ते 11 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे इथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत धनंजय लोखंडे ,विजय घोटेकर ,,योगिता महाजन, प्रतिक्षा कोटकर यांनी पंच म्हणून काम केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड परिश्रम घेतले .

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!