नांदेड। श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्या बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा येथील गुन्हेशोध पथकास काल दिनांक 03/04/2024 पोलीस स्टेशन इतवारा हाददीत बिलालनगर, चौफाळा, इतवारा येथे महाराष्ट्र शासनांने बंदी घातलेले गुटखा, सुगंधी जर्दा, व पान मसाला साठवुन ठेवल्या बाबत गोपनिय माहीती मिळाली.
त्यावरुन बिलालनगर, चौफाळा, इतवारा येथे जावुन रेड केला असता तेथे महाराष्ट्र शासनांने बंदी घातलेले गुटखा, सुगंधी जर्दा, व पान मसाला असा एकुन 1,72,430/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. यावरुन पोलीस स्टेशन इतवारा गुन्हा नोंद क्रमांक 88/2024 कलम 328,272, 273,188 भादवी प्रमाणे आरोपी अब्दुल जमील अब्दुल सत्तार वय 40 वर्ष, रा. बिलाल नगर चौफाळा, नांदेड याचेवर गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु चव्हाण नेमणुक इतवारा पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदर कार्यवाही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनात सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा नांदेड उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों / चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजु सिटीकर यांनी केली असुन त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.