नांदेड/माहूर| मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन महाराष्ट्र राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मोठा वाद सुरू झाला आहे. मराठा आंदोलच्या पार्श्वभूमीवर माहूरमधे मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. माहूरमध्ये दखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माहूरगडावर जाऊन महाराष्ट्रातील चौथे शक्ती पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुरच्या श्री रेणुका मातेचे दर्शन घेत विधीवत पूजा करुन आरती केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची सरकारला सद्बुद्धी दे…असं साकडं त्यांनी रेणुका देवीला घातल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.
त्यानंतर ते सभा स्थळाकडे जात असताना ओबीसी आंदोलकांनी काळे झंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सतर्क होऊन ओबीसी आंदोलकांना ताब्यात घेतलं. आणि सभा संपल्यानंतर सोडून देण्यात आलं. ओबीसी आंदोलकानी सभास्थळी धाव घेऊन गोमूत्र शिंपडलं. ओबीसी आंदोलकांनी गुमुत्र शिंपडल्याचे समजताच मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी सभास्थळी जाऊन दुग्धाभिषेक केला. यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याने माहूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शांतता व सुव्यस्था राहावी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या तणावपूर्ण संतत आहे.