नांदेड| तृतीयपंथी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणून समान शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णय अनुसार सर्व प्रकारचे उच्च शिक्षण तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत मिळण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी विद्यापीठात तसेच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृतीया पंथी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी विद्यापीठाच्या स्व निधीतून भरावी असे निर्देश महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 8 (7) मधील तर तरतूदिनुसार देण्यात आले आहेत. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व संलग्नित शासकीय अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या स्व निधीतून भरण्यात यावे अशी निर्देशन शासन निर्णय मध्ये देण्यात आले आहेत.
तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण अधिनियम 2019 मध्ये तृतीय पंथांच्या हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यासाठी आणि शासनाने तयार केलेल्या कल्याणकारी योजनेमध्ये त्यांचा प्रवेश सुलभ करण्यासाठी शासन योग्य अशा कल्याणकारी उपयोजना करेल अशी तरतूद आहे या अधिनियमातील कलम दोन की मध्ये तृतीयपंथीय व्यक्तीच्या व्याख्या विहित करण्यात आली असून प्रकरण तीन मध्ये तृतीयपंथी व्यक्तीची ओळख प्रमाणे करण्याबाबतची तरतुदी विहित केलेल्या आहेत यामध्येच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या राज्यांमध्ये अंमलबजावणीच्या अनुषंगाने माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक पाच डिसेंबर २०२३ रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी आर्थिक समस्या विचारात घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा अनुषंगाने अशा विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा यासाठी सर्व कृषी विद्यापीठांना आवाहन करण्यात आले होते. माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदरील शासन निर्णय घेत तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक फी माफ करण्यासाठीचे आदेश सर्व विद्यापीठांना करण्यात आले आहेत अशी माहिती तृतीयपंथी कल्याण मंडळ सदस्य डॉ. सान्वी जेठवाणी यांनी दिली.