मनपा खाजगी व्यवस्थापना कडील महिला पुरुष साफसफाई कर्मचारी दुसऱ्या दिवशीही काम बंदआंदोलन
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत खाजगी व्यवस्थापन कंपनीच्या स्वच्छता साफसफाई महिला पुरुष कर्मचारी यांनी १७ व १८ आक्टोबर रोजी थकीत पगारी न झाल्यामुळे काम बंद आंदोलन केल्यामुळे सिडको, हडको, जुना कौठा नवीन कौठा भागात खाजगी महिला पुरुष साफसफाई काम बंद आंदोलन केल्यामुळे मुख्य रस्त्यावर कचरा कचरा विखुरलेल्या अवस्थेत पसरला असून रस्त्यावर असलेला कचरा अस्त व्यस्त पसरलेले अवस्थेत पहावयास मिळाला आहे.
मनपा हद्दीत दैनंदिन साफ सफाई करण्याराय खाजगी व्यवस्थापन सफाई महिला पुरुष कामगार यांना देण्यात येणारा दोन महिन्याच्या पगार व बोनस थकल्या मुळे मनपा हद्दीत सर्व झोन सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० मधील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते सफाई काम बंद आंदोलन करण्यात आला आहे, परंतु १७ आक्टोबर रोजी सकाळी अचानक सफाई कामगार यांनी थकीत पगार न झाल्याने साफसफाई करण्याचे काम बंद आंदोलन केल्यामुळे मुख्य रस्त्यावर व अंतर्गत भागात कचरा ढिगारे पसरले दिसून आले तर अनेक भागात कचरा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे दुरंगधी पसरली आहे, पहिल्या दिवशी काही भागात मनपाच्या कायम स्वरूपी कर्मचारी महिला यांच्या मार्फत स्वच्छता करण्यात आली आहे. पंरतु रस्तात्त्यावरील कचरा उचलला नसल्याने ढिगारे जसे ते अवस्थेत आहेत, दुसऱ्या दिवशी १९ आक्टोबर रोजीही काम बंद आंदोलन मुळे पुन्हा कचरा वाढत गेला तर काही भागात कुत्रे, वराह, मृत अवस्थेत आढळल्याने दुरंगधी पसरली आहे.
या प्रकरणी स्वच्छता मुख्य उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला असता द कचरा ऊचलण्यात येईल असे सांगितले तर सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी मनपा मध्ये कार्यरत असलेल्या काही सफाई कामगार यांच्या कडून स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून पहिल्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी काही भागात सफाई केली तर दुसऱ्या दिवशी मात्र सफाई नसल्याने वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको,जुना कौठा, नवीन कौठा, वसरणी व सिडको झोन अंतर्गत अनेक भागात कचरा ढिगारे आढळून आले आहेत. नवरात्र महोत्सव काळात अनेक महिला भक्त बालाजी मंदिर, नवरात्र सार्वजनिक दुर्गा महोत्सव, दुर्गा मंदीर जाणाऱ्या महिला भाविकांना मात्र रस्त्यावरील कचराचा सामना करावा लागला, प्रशासनाने तात्काळ या बाबत सफाई कामगार यांच्या पगारी करून हे आंदोलन मागे घ्यावे व रस्त्यावरील कचरा बाबत तात्काळ तोडगा काढून कचरा संकलन करावा अशी मागणी होत आहे.