
नांदेड| येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (NMMS) यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या आठवीच्या NMMS परीक्षेत एकूण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यापैकी १३ विद्यार्थी केंद्र शासनाच्या NMMS शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तसेच २० विद्यार्थी राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा तथा माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, सचिव व माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार ऍड श्रीजया चव्हाण, सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, खजिनदार ऍड. निंबाळकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस.आर. कदम, उपमुख्याध्यापक ए. आर. कल्याणकर, पर्यवेक्षिका सौ. देशमुख, मार्गदर्शक शिक्षक साईनाथ कांडले, प्रल्हाद घोरबांड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
