
नांदेड। लोहा तालुक्यातील कापसी बु येथील ग्रामसेवक व सरपंचाच्या पतीने संगनमत करुन घनकचरा व व्यवस्थापन योजनेतील साहित्य गावात न वापरता ते घरामध्ये दडवून ठेवलेल्याचे चौकशीत आढळून आले असून ते साहित्य तात्काळ वापरात आणावेत असे आदेश चौकशी अधिकार्यांनी दिले आहेत. दरम्यान या भ्रष्ट कारभाराला पाठींबा देणारे ग्रामसेवकाने मात्र आजारपणाचे ढोंग करून चौकशीतून अंग काढून घेतले आहे.
कापसी बु येथील घनकचरा व व्यवस्थापन योजनेंतर्गत शोषखड्डा व घनकचरा व्यवस्थापन योजनेतील कामे निकृष्ट करण्यात आली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी उपअभियंता डिकळे व विस्तार अधिकारी देशपांडे हे चौकशी करण्यासाठी कापसी बु येथे आले होते. घनकचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत शौषखडा काम निकृष्ट करण्यात आले होते.
सदर कामातील त्रुटी दूर करून कामे नव्याने करावेत असे उपभियंता यांनी कळविले होते. परंतु त्यांनी घाईघाईने बील काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. कापसी बु येथे उप अभियंता डिकळे व विस्तार अधिकारी देशपांडे हे चौकशी करत असताना घनकचरा व्यवस्थापन योजनेतील अनेक साहित्य दिसून आले नाही. या प्रकरणाची माहिती घेतली असता सदर साहित्य हे ग्रामसेवक गोविंद माचनवाड यांच्या आशीर्वादाने घरात दडवून ठेवलेल्याचे चौकशीत आढळून आले. सदर साहित्य तातडीने गावातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन कामांसाठी उपयोगात आणावे असे कळविले.
तसे त्यांनी आपल्या अहवालात नोंद केली असल्याचे सांगितले. दरम्यान सदर साहित्य गावाच्या कामांसाठी न वापरता ते स्वतः वापरत असल्याचे आढळून आले आहे. कापसी बु येथील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे ग्रामसेवक गोविंद माचनवाड हे मात्र आजारपणाचे ढोंग करून चौकशीतून अंग काढून घेतले. गावातील जागरुक नागरिक श्रीकांत पाटील वडवळे यांनी सरपंच यांच्या घरात घनकचरा साहित्य दडवून ठेवलेल्याचे चौकशी अधिकारी यांना सांगितले व हे साहित्य अधिकारी यांना दाखविल्याचे सांगितले.
