हिंगोली/नांदेड| महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा देत खा. हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता व मागील दोन अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते त्यावेळेस त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या रोषासही सामोरे जावे लागले होते. शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी हेमंत पाटील यांना राजीनामा परत घेण्याची विनंतीही केली होती. पण आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालु असतांना खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनी फेटाळुन लावला.
महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी सदरील आंदोलनास पुर्ण पाठींबा देत खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा देवुन मराठा समाजाला न्याय द्यावा. यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर आरक्षणासाठी
उपोषण करूण मौण वृत्त धारण केले होते. सरकारचेही लक्ष खासदार हेमंत पाटील यांनी वेधले होते.
आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरु केले होते त्या आंदोलनास पाठींबा देणारे व आपल्या पदाचा राजीनामा देणारे मराठवाडयातील एकमेव नेते खा. हेमंत पाटील हे ठरले असुन मराठा आरक्षण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांनी हा प्रश्न निकाली काढला असल्याने या पार्श्वभुमीवर लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी खा. हेमंत पाटील यांना बोलावुन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्यासमोर हजर केले असता आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला.
खासदार हेमंत पाटील हे देशाच्या अर्थविषयक स्थायी समितीवर असुन त्यांना अर्थविषयक स्थायी समितीच्या बैठकित उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे अशी माहिती सुत्राकडुन कळाली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा देवुन मराठा समाजाला न्याय द्यावा यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मौनव्रत धारण करुन आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण केले होते हे विशेष.