शिवनगर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

नांदेड। बाराव्या शतकात समतेचा संदेश देणारे वीरशैव लिंगायत धर्म प्रचारक क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती दर वर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात शिवनगर येथील महात्मा बसवेश्वर महाराज चौक या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी शिवनगर येथील रहवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी भंडार्याचे आयोजन केले होते. महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्ताने महिला मंडळाची भजन, कीर्तन सेवा पार पडली. यावेळी सौ.अनिता स्वामी, सौ. लक्ष्मीबाई स्वामी,सौ.प्रणिता स्वामी, सौ.ज्योती स्वामी, सौ. स्वाती स्वामी,सौ.श्रेया स्वामी, सौ. मामिलवाडताई, सौ. सविता कोल्हे यांनी सहभाग घेतला.
जयंतीचे नियोजन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय सचिव प्रवक्ते वैजनाथ स्वामी,शिवहर स्वामी,प्रशांत स्वामी, बालाजी स्वामी,बबन स्वामी,गणेश स्वामी,माधव स्वामी, कृष्णा स्वामी,ऋषिकेश स्वामी,श्रीकांत स्वामी,आदर्श स्वामी, गायत्री स्वामी, शुभांगी स्वामी,वेदांत स्वामी,मन्मथ स्वामी,सुभाष स्वामी,भगवान स्वामी,बालाजी पत्तेवार,गजानन इंगळे,गोविंद कुलकंठे, चीलवंत अप्पा, श्रीकांत रामपटवार,गुळवे,संतोष बारसे,साईप्रसाद मंठाळकर ,देविदास मठपती, सुकेश बेरुळकर आदींनी परिश्रम घेतले.
