धर्म-अध्यात्मनांदेड

नवरात्रोत्सवानिमित्त काळेश्वर ते रत्नेश्वरी देवी मंदिर पदयात्रा रत्नेश्वरी देवीला अर्पण करणार साडीचोळी

नवीन नांदेड। नवरात्रोत्सवानिमित्त नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर आणि नांदेड दक्षिणचे आ.मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने काळेश्वर मंदिर विष्णुपूरी ते माता रत्नेश्वरी देवी मंदिरापर्यंत गुरुवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव सुरु होताच माता रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातूनच नव्हे महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशातील भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात. रत्नेश्वरी गडाचा पौराणिक ग्रंथात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.

नवरात्रात महिला- भगिनींकडून, भक्तगणांकडून श्री. माता रत्नेश्वरीची खणानारळाने तसेच साडीचोळीने ओटी भरून तिचे आशीर्वाद घेतले जातात. 19 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार्या पदयात्रेचे औचित्य साधून श्री माता रत्नेश्वरी देवीला साडी-चोळी अर्पण करण्यात येणार असून भव्य पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार माता रत्नेश्वरी देवी स्नानादी व महापुजाविधीसाठी काळेश्वर येथे येत असतात.

माता रत्नेश्वरी देवीची साडी-चोळी व ओटी भरण्याची पारंपारिक प्रथा आहे. ही प्रथा पुढे चालू रहावी व यानिमित्त तमाम भाविकांना दर्शनासाठी योग जुळवून यावा, या हेतूने 19 ऑक्टोबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत तमाम भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व माता रत्नेश्वरीला साडी – चोळी अर्पण सोहळा व पालखी सोहळ्याचे साक्षीदार बनावे, असे आवाहन माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, मोहनराव हंबर्डे यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!