उस्माननगर| कै. नागोराव गणपतराव पांडे , लाठकर वैद्यकीय ट्रस्ट , नांदेड व समता माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. भास्कर नागोराव लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार येथील मनमिळावू , स्वभावाचे ,कलेची जाण ओळखणारे आदर्श शिक्षक विश्वासराव लोखंडे गुरुजीसह सहपत्नीक यांना समता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा पंचक्रोशीतल ॠषीतुल्य व्यक्तीमत्व श्यामसुदरराव जहागीरदार गुरूजी यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह ,दस्ती टोपी ,साडी चोळी , आहेर सौ.मणिषा व डॉ. अरविंद लाटकर यांनी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी हे होते तर.प्रमुख पाहूणे म्हणून भालचंद्र लाटकर , पुरस्कार प्राप्त विश्वसराव लोखंडे ,सौ. नलिनी वि.लोखंडे , अरविंद कुलकर्णी लाटकर , कमलाकरराव देशपांडे ( अध्यक्ष ) मुकुंदराव कुलकर्णी गुरुजी ( सचिव ) प्रदीपराव देशमुख ( संचालक ) गोविंदराव बोदेमवाड ( मुख्याध्यापक ) श्री.इंगळे उमरखेडकर ,जलील शेख , पत्रकार उमरखेड मजर खान , डॉ.प्रकाश देशमुख , मारोती घोरबांड मुंबई , लक्ष्मण कांबळे ,धम्माजी गुंडीले , लक्ष्मण भिसे , माणिक भिसे, गणेश लोखंडे , अमोल शेळके यांच्या सह आदीची उपस्थित होती.सर्वप्रथम कै.श्रीमती आनंदीबाई पांडे ,कै.भास्कर नागोराव लाठकर , कै. शैलजा भालचंद्र लाटकर ,कै. नागोराव गणपतराव पांडे , लाटकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, दिपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक भालचंद्र लाटकर यांनी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रमांची आखणी व माहिती विशद केली. दरवर्षी ट्रस्टच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत , शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वकृत्व स्पर्धा , आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येतात. कै.शैलजा भालचंद्र लाटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेत वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते अनुक्रमे स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. कै. नागोराव गणपतराव पांडे लाठकर व कै. आनंदीबाई नागोराव लाठकर , यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली. त्यांनंतर माजी विद्यार्थी मारोती घोरबांड , रामेश्वर पांडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व मारोती घोरबांड यांनी वकृत्व स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर कै. भास्कर नागोराव लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार ” जीवन गौरव पुरस्कार २०२३ ” चा या वर्षाचा जीवन गौरव पुरस्कार उस्माननगर येथील माजी मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक , शिस्त प्रिय शांत संयमी स्वभावाचे विश्वसराव विठ्ठलराव लोखंडे गुरुजी व सहपत्नीक सौ.नलिनीबाई विश्वासराव लोखंडे यांना शाळेचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी यांच्या हस्ते आहेररूपी भेट , सन्मानचिन्ह ,प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी यांनी मनोगत व्यक्त करून कार्याची प्रशंसा केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र लाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक राजीव अंबेकर यांनी केले.यावेळी शाळेतील सहशिक्षक , विद्यार्थी ,ईष्टमित्र परिवार उपस्थित होते.
सम्राट शाळेच्या वतीने सत्कार..
कै.भास्कर नागोराव लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व शाल पांघरून सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनसळे , भगवान राक्षसमारे , देविदास डांगे ,मन्मथ केसे ,अंगुलिकुमार सोनसळे ( ग्रामपंचायत सदस्य ) येवतीकर सह नागरिकांनी सत्कार करण्यात आला.