नांदेड। नांदेड दक्षिण मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या एक कोटी 29 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आ. मोहनराव हंबर्डे यांच्याहस्ते झाले.
आमदार स्थानिक 13 लाख विकास निधीतून शहरातील इतवारा पोलिस स्टेशन परिसरात साईबाबा मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. कार्यक्रमाच्या औचित्याने इतवारा साईबाबा मंदिरात आ. हंबर्डे यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती संपन्न झाली. याप्रसंगी माजी खा.भास्करराव पा. खतगावकर,ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह मान्यवर व परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
धनेगाव येथे मंजूर 36लाख रूपये आमदार स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, सरपंच पिंटू पा. शिंदे आदी लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय बेटसांगवी मोहनपुरा येथे 80 लाख रुपये आमदार स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. सदर विकासकामांत गावातील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम व सिमेंट काँक्रिट रस्त्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याप्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य श्रीनिवास मोरे बेटसांगवीचे सरपंच राम वानखेडे यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.