नांदेड। पत्रकारांचा गौरव व्हावा या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून कंधार येथील कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण व हिंदवी बाणा परिवाराच्या वतीने जिल्ह्यासह राज्यातील पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, त्यात दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांना जिवन गौरव पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाला असून अन्य पुरस्कारामध्ये भारत दाढेल, विलास बडे, फराह खान, राज ठाकूर आदींचा समावेश आहे.
दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाणचे सचिव मिर्झा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेऊन २०२३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आयबीएन लोकमत १८ चे निवेदक विलास बडे यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पत्रकारीता पुरस्कार तर लोकशाही न्यूज चॅनलच्या निवेदिका फराह खान यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भूषण पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर सामनाचे माहूर येथील प्रतिनिधी राज ठाकूर यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
१ जानेवारी रोजी कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाणचे सचिव मिर्झा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यामध्ये २०२३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
विजय जोशी दैनिक सामना जिल्हा प्रतिनिधी यांना जिवन गौरव पत्रकारीता पुरस्कार, भारत दाढेल दैनिक लोकमतचे उपसंपादक यांना महात्मा फुले उत्कृष्ट पत्रकारिता जिल्हास्तरीय पुरस्कार, सतीश मोहिते झी २४ तास नांदेड प्रतिनिधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राम विकास पत्रकारिता पुरस्कार, जाहीर करण्यात आला आहेत.
तसेच बाबुराव पाटील भोकर दैनिक सकाळ प्रतिनिधी यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार, स़ंजय कोलते दैनिक देशोन्नती मुदखेड प्रतिनिधी यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शोध पत्रकारिता पुरस्कार, योगेंद्रसिंह ठाकुर दैनिक प्रजावाणी प्रतिनिधी कंधार यांना आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आदर्श पत्रकारिता पुरस्कार, किशन भोयर दैनिक पुण्यनगरी किनवट प्रतिनिधी यांना प्रबोधनकार ठाकरे पत्रकारिता पुरस्कार, आनंद मोरे दैनिक पुढारी अर्धापूर प्रतिनिधी यांना कै.वसंतराव नाईक पत्रकारिता पुरस्कार, राज ठाकुर दैनिक सामना माहुर प्रतिनिधी यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पत्रकारिता पुरस्कार, दादाराव इंगळे दैनिक एकमत बिलोली प्रतिनिधी यांना बाळासाहेब ठाकरे रोखठोक पत्रकारिता पुरस्कार,
परमेश्वर गोपतवाड दैनिक देशोन्नती हिमायतनगर प्रतिनिधी यांना डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार, मुर्तुजा शेख दैनिक देशोन्नती प्रतिनिधी लोहा यांना डॉ.भाई केशवराव धोंडगे पत्रकारीता पुरस्कार, यशवंत बोडके दैनिक मराठवाडा नेता मुखेड प्रतिनिधी यांना कै.सुधाकरराव डोईफोडे सामाजिक पत्रकारीता पुरस्कार, गंगाधर धडेकर दैनिक गावकरी धर्माबाद प्रतिनिधी यांना कै. विलासराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार, गौतम वाठोरे दैनिक एकमत हदगाव प्रतिनिधी कै. गोपीनाथराव मुंडे पत्रकारिता पुरस्कार, साहेबराव तुरेराव दैनिक तरुण भारत उमरी प्रतिनिधी यांना कै. रवींद्र रसाळ पत्रकारिता पुरस्कार, सईद इर्शाद शादुल पटेल दैनिक समिक्षा देगलुर प्रतिनिधी यांना कै. माधवराव अंबुलगेकर पत्रकारिता पुरस्कार, प्रभाकर तुळशीराम लखपत्रेवार सकाळ प्रतिनिधी नायगाव यांना कॉ.अंनतराव नागापुरकर पत्रकारीता पुरस्कार, विठ्ठल चिवडे सकाळ कुरुळा ग्रामीण प्रतिनीधी यांना कै.दुर्गादास सराफ ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
याच प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणार्या एका व्यक्तीला पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्यात माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांना संत गाडगे बाबा सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, ओबीसी नेत्या तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे आदी मान्यवरांना निमंत्रीत करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून, हा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम कंधार येथे घेण्यात येणार आहे.