धर्म-अध्यात्मनांदेड
आदर्श गाव टेंभी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मूर्ती स्थापना व कलशरोहन सोहळा थाटात संपन्न
हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या निमित्ताने स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा आयोजित करण्यात आली होती. त्या कथेचा समारोप तसेच मूर्ती स्थापना व कलश रोहन सोहळा बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, चैतन्य महाराज कोंडदेव आश्रम, गोपाळगीर महाराज दत्त बर्डी यांच्या उपस्थितीत दि 01 में रोजी मोठया थाटात संपन्न झाला.
हिमायतनगर तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील हनुमान मंदिरात दिनांक 23 एप्रिल हनुमान जन्मोत्सव दिनी संकटमोचन बजरंगबली हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली. त्यानंतर दिनांक 24 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, श्री हनुमान मंदिराचा कळसारोहन आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. सप्ताहात दररोज सकाळी पाच ते सहा काकडा भजन, सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी दोन ते पाच श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना आणि रात्री आठ ते दहा तीस यावेळेत धार्मिक कीर्तनकार यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान सप्ताहात ह भ प राम महाराज पांगरेकर, ह भ प अशोक सुरडकर अकोला, ह भ प विवेक कुरुमकर अकोला, ह भ प प्रशांत ठाकरे अकोला, ह भ प मारुती महाराज इंद्रवेलीकर, तेलंगाना, ह भ प शिवदास महाराज श्रुगारे मोझरी, ह भ प सुनील महाराज लांजुळककर, आणि सप्ताहाच्या शेवटी बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन होऊन भव्य महाप्रसादाने धार्मिक कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
समारोप दिलेले गावातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या गजरात आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सकाळी रामधून काढून जय श्रीराम, जय हनुमान नामाचा जयजयकार करण्यात आला. तसेच कलशाची मिरवणूक काढून कलश रोहन सोहळा बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव, चैतन्य महाराज कोंडदेव आश्रम, गोपाळगीर महाराज दत्त बर्डी यांच्या उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला. दरम्यान सप्ताहात दररोज अन्नदात्याकडून सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा अन्नदान करण्यात आले.
सप्ताहात गायनाचार्य म्हणून हभप सुभाष महाराज वानखेडे ह भ प संतोष महाराज मस्के हार्मोनियम वादक म्हणून हभप गोपाळ महाराज चव्हाण मुजळेकर तबलावादक म्हणून हभप ज्ञानेश्वर महाराज चव्हाण मुजळेकर मृदंगाचार्य म्हणून ह भ प विकेस महाराज पुरी हिंगोली कर चौपदर महाराज आंबेगावकर यांनी काम पाहिले तसेच हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सवना पारडी आंबेगाव पूना बोरगडी हिमायतनगर मुरगळा गुरुदेव सेवा मंडळी भजनी मंडळ व समस्त टेंभी गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.