हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा (बु) येथे आमरण उपोषणनातील युवक ज्ञानेश्वर माने यांची प्रकृती खालावली
हिमायतनगर। गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा (बु) येथे तिघेजण आमरण उपोषणाला बसले आहेत, उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणनातील युवक ज्ञानेश्वर माने यांना चक्कर येणे, घाम येणे,ताप सुरू झाला, त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी आज तपासणी केली असता त्यांचे 5 किलो वजन कमी झाले असल्याचे सांगितले.
मराठा समाजास आरक्षण मिळाव म्हणुन सराटी येथे मराठ्यांचा योद्धा मनोज पाटिल जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून पारवा (बु) येथे ज्ञानेश्वर गणेशराव माने ,बाजीराव खंडु मोरे, श्रीरंग परसराम जाधव हे गेले चार दिवस झाल अमरण उपोषण करत आहेत. पाचव्या दिवशी ज्ञानेश्वर माने यांची तब्येत खालावली असून, आमरण उपोषण सुरू असल्याने त्यांचं4 किलो वजन कमी झाले असल्याचे आज दि 2 रोजी पाचव्या दिवशी वैद्यकीय अधिकारी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी चेकअप करून सांगितले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील ठिक ठिकाणी साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सकल मराठा समाज बांधव महिला पुरुष, बालके देखील सहभागी झाले आहेत. पारवा बु येथील नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने केले जाते आहे. त्यांच्या उपोषणाला गावातील नागरिक कैंडल मार्च, कीर्तन भजन करून उपोषणकर्त्यांना बळ देत आहेत. दरम्यान उपोषणातीळ एकाची प्रकृती खालावल्याने गावकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ मराठा समाजातील उपोषण कर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लाऊन आमरण उपोषण करणाऱ्याना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.