उस्माननगर, माणिक भिसे।उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे लोढेसांगवी ता .लोहा येथे १० जाने.रोजी दुपारी ६० वर्षी शेतकऱ्यांवर हल्ला कल्याने शेतकरी ठार तर जोशीसांगवी ता.लोहा येथील शेतात हिंस्र प्राण्यांने काळवीटावर हाल्ला करून दोघांना ठार केल्याच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जोशी सांगवी शिवारामध्ये ११ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर दिवाकर वैद्य यांच्या शेतात हिंस्र प्राण्याने एका काळवीटाचा फडशा पाडल्यामुळे या परिसरामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर १० जानेवारी रोजी लोंढे सांगवी शिवारात शेषेराव माणिकराव लोंढे यांचा हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला.
ही घटना ताजी असतानाच व त्या शेतकऱ्यावर कोणत्या प्राण्याने हल्ला केला, याचे वन विभागाला निदान लागण्यापुर्वीच ११ जानेवारी रोजी मध्यरात्री जोशी सांगवी शिवारात हिंस्र प्राण्याने आणखी एका काळवीटाचा फडशा पाडल्यामुळे तो बिबट्याचाच हल्ला असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या परिसरात कास्तकारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळाला सोनखेड पोलिस व उस्माननगर पोलीस व वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे. तसेच या भागातील जनतेला जागरुक राहण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तर दुसऱ्या घटनेत लोढेसांगवी ता.लोहा येथील शिवारात दहा जानेवारी रोजी दुपारी २ वा. दरम्यान कोणत्यातरी हिंस्र प्राण्यांने हल्ला करून ६० वर्षीय शेतकऱ्यास ठार झाल्याची दुर्दैवी घटनेने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लोढेसांगवी ता.लोहा येथील शेतकरी शेषेराव माणिकराव लोंढे (६०) वर्षे हे आपल्या शेतीच्या कामासाठी त्यांच्या शेतात गेले असता भर दुपारच्या वेळी अज्ञात हिंस्र प्राण्यांने त्यांच्यावर हल्ला करून त्याच्या गळ्याला जब्बर लचाका काढून जागीच ठार झाले. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना याची माहिती समजताच घटस्थळी थाव घेऊन पहाणी करून ताबडतोब संबंधित पोलिस स्टेशन ला कळवून शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले.सदरील दोन्ही घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे.
लोढेसांगवी व जोशीसांगवी शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे माहिती वनविभागाच्या कर्मचारी यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे.