कलेक्टर साहेबांच्या शब्दावर एका मिनिटात शकडो लोकांनी उपोषण सोडले ; उर्वरित पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी पैसे मिळणार – कॉ.गंगाधर गायकवाड
नांदेड| २६-२७ जुलैच्या अतिवृष्टी मधील मंजूर यादीत अनेक खऱ्या पूरग्रस्तांना डावलले त्यांचा पुन्हा सर्वे करावा आणि त्यांना तात्काळ अनुदान स्वरूपात मंजूर झालेली रक्कम देण्यात यावी ही प्रमुख मागणी आणि इतरही मागण्यासाठी सीटू संलग्न मजदूर युनियनच्या दि. २ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु केले होते.सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांच्या मागण्या घेऊन लहान मोठी नऊ ते दहा आंदोलने करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
परंतु ज्यावेळी पूरग्रस्तांना पैसे वर्ग होणे सुरु झाले तेव्हा मात्र घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या अनेक पूरग्रस्तांचे नावे पात्र यादी मध्ये कुठेही नव्हती. मोर्चे, आंदोलनात हजर असलेल्या बऱ्याच जणांना डावलण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या. रात्रभर उपोषणार्थी जिल्हाधिकारी कार्यालया समोर असल्याची जाणीव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना झाली होती.कारण जिपीएस कॅमेरॅ द्वारे काढलेले फोटो त्यांना रात्री अडीच वाजता वॉट्सअप द्वारे पाठविण्यात आले होते. दि.३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी यांच्या सोबत सीटू च्या शिष्टमंडळाने प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली.तेव्हा कलेक्टर साहेबांनी जे वाक्य बोलले त्यामुळे शिष्टमंडळातील सर्वांनाच आनंद झाला.दिवाळी पूर्वी शहरातील सर्वच पूरग्रस्तांना पैसे मिळतील सुरु असलेले उपोषण सोडा. हे शब्द ऐकटाच सिटूच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तात्काळ चर्चा करून एका मिनिटात उपोषण थांबविण्याचा निर्णय घेतला.
नांदेड दक्षिणचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी केली मदत तर आमदार कल्याणकरांनी फोनच उचलला नाही
नांदेडच्या दोन्ही आमदारांना कॉ. गायकवाड यांनी फोन करून हकीगत सांगण्याचा प्रयत्न केला परंतु उत्तरचे आमदार कल्याणकरांनी फोन उचलला नाही आणि प्रतिसाद दिला नाही. मात्र दक्षिणचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी वेळोवेळी फोन घेतला आणि पूर्ण सहकार्य केले तसेच पात्र पूरग्रस्तांची यादी देखील तात्काळ उपलब्ध करून दिली.
मौजे कासारखेडा येथील मायक्रो फायनान्सच्या पीडित महिलांना देखील दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार तसेच माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथील प्रलंबीत अर्जदारांना प्लॉट्स आणि घरकुलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. रात्री उपोषण सोडविण्यात आले असून लवकरच पूरग्रस्तांना पैसे बँक खात्यावर वर्ग होतील अशी आशा उर्वरित पूरग्रस्तांना आहे.
जिल्हाधिकारी साहेबांच्या एका शब्दावर उपोषण सोडविले एवढे मात्र खरे.परंतु पन्नास किलो अन्न धान्य ही मागणी प्रस्तावित आहे.पूरग्रस्तांचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.सोनाजी कांबळे,कॉ.केशव सरोदे,कॉ.इम्रान पठाण आदींनी परिश्रम घेतले. अशी माहिती कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.