नांदेड/कंधार| दिनांक 10/04/2024 रोजी पोलीस ठाणे कंधार हद्दीमध्ये हातईपुरा, कंधार येथील एका इसमाचे घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा असल्याबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना खात्रीशिर माहीती मिळाली. त्यांनी मिळालेली माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांना कंधार येथे रवाना केले.
दिनांक 10/04/2024 रोजी स्थागुशाचे पथकाने हातईपुरा, कंधार येथील शेख नौशाद शेख ताहेर रा. हातईपुरा, कंधार यांचे घरी पंचासमक्ष जावुन छापा मारला असता, सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा किमती 1,88,298/- रुपयाचा मिळुन आला आहे. सदरचा गुटखा पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन आरोपी नामे शेख नौशाद शेख ताहेर रा. हातईपुरा, कंधार ता. कंधार जि. नांदेड याचेविरुध्द पोलीस ठाणे कंधार येथे गुरनं. 130/2024 कलम 328, 272, 273 भा. दं. वि. सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 26 (2), 27 सहकलम 30 (2) (अ) 59 (IV) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / रवि वाहुळे, पोह/ गुंडेराव करले, पोना/विठ्ठल शेळके, पोकों/बालाजी यादगीरवाड, ज्वालासिंघ बावरी, गजानन बयनवाड, मपोना/किरण बाबर, चालक पोहेकों/अर्जुन शिंदे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.