नायगाव, रामप्रसाद चन्नावार| येथील शरदचंद्र महाविद्यालयामध्ये थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधुन स्वच्छता कर्मचारी सौ. क्रांती प्रल्हाद भालेराव व सौ. ललीता साईनाथ माचनूरकर यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के हरीबाबू यांच्या कल्पनेनुसार महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ मनिषा पांगरकर आणि सौ. आश्विनी जक्कावाड यांच्या वतीने स्वच्छता महिला कर्मचाऱ्याचे शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सेवानिवृत प्राध्यापक डॉ शंकर गड्डमवार व प्रोफेसर डॉ.बलभीम वाघमारे यांनी गाडगेबाबाच्या विज्ञानवादी दृष्टी आणि सामाजिक कार्याबद्दल विचार मांडले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.के. हरीबाबू म्हणाले की, गावातील स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छता करण्याचे काम गाडगेबाबानी केले. आज गाडगेबाबाचे परिसर स्वच्छ करण्याचे कार्य महाविद्यालयातील महिला कर्मचारी करीत असल्यामुळे महाविद्यालयाचा परिसर अतिशय स्वच्छ दिसत आहे असे उद्गार त्यांनी काढले.आजच्या काळात परिसर स्वच्छ ठेवल्यास आणि विज्ञानवादी दृष्टी विकसित केल्यास देशाची आणि स्वतःची देखील प्रगती होण्यास मदत होईल यावेळी प्रोफेसर डॉ. श्रीरंग वट्टमवार, प्रा.डॉ.एस.एस. अंजनीकर, प्रा.मारोती कदम, प्रा एस.आर. यादव, बालाजी काळे, संतोष भालेराव इ कर्मचारी उपस्थित होते.