हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पुनर्वसित गावांच्या सर्वागीण विकासाठी हिंगोलीचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या पुढाकारातून व तसेच हदगाव, हिमायतनगर विधानसभेचे नेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून मोठ्याप्रमाणात निधी मंजूर झाला आहे. अंदेगाव ( पुर्व ), अंदेगाव ( पश्चिम ), पवना, दुधड, टेंभुर्णी, कामारी आदि गावाला शासनाच्या निधीचा लाभ होणार असून या कामी सर्वंकष विकास कामांसाठी १४ कोटी ८३ लाख ७२ हजार रूपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. अशी माहीती शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिली.
तत्कालीन हदगाव तालूका व आताचा हिमायतनगर तालुक्यातील अंदेगाव, दुधड, पवना, टेंभुर्णी, कामारी ह्या गावात १९८३ ला महापूर आल्याने ही गावे बाधित झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या बाबीकडे लोक प्रतिधीनीनी लक्ष दिले नव्हते. परंतू खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी या बाबींकडे आपले लक्ष केंद्रित करून शासनाकडे उपरोक्त निधीची मागणी केली होती. खासदार पाटील यांच्या प्रथम मागणीचा धागा पकडून जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी खासदार हेमंतभाऊ पाटील व बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन १४ कोटी ८३ लाख ७२ हजार रूपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. या उपलब्ध निधीतून अंदेगाव, ( पुर्व ), अंदेगाव ( पश्चिम ), पवना, दुधड, टेंभूर्णी, कामारी या पुनर्वसित गावात सि. सी. रस्ते, सि. सी. नाली व समाज मंदिराचे बांधकाम ही कामे अग्रक्रमाने करण्यात येणार आहेत.
पाणी पुरवठा, यासह मुलभूत सोयी, सुविधेकडेही लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगीतले. हदगाव, हिमायतनगर विधान सभा क्षेत्रातून पैनगंगा व कयाधू या दोन मोठ्या नद्या वाहतात. या नद्यांना महापुर आल्याने नदीकाठची गावे सातत्याने पुराने बाधीत होतात. त्या गावांच्या पुनर्वसनाकडे मंत्री महोदयांनी लक्ष द्यावे. अशी मागणी ही जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे.