नांदेड| जिल्ह्यातील धर्माबाद कलम 379 भादवि मधील एक आरोपी कडून चार मोटार सायकल सह 2,35,000/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दिनांक 03.11.2023 रोजी पोस्टे धर्माबाद गुरन 272 / 2023 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढुन सदर गुन्हयात संशयीत नामे साईनाथ मारोती मॅकलवाड, वय 18 वर्षे, रा. मदनुर ता. धर्माबाद जि. नांदेड ह. मु. धर्माबाद यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने धर्माबाद शहरातील शिक्षक कॉलनी येथुन मोटार सायकल चोरल्याची कबुल करून त्यांच्या ताब्यातुन एक होंडा सिबी शाईन कंपणीची मोटार सायकल जप्त करण्यात आली. तसेच त्याचे कडुन इतर तीन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. असे एकुण चार मोटार सायकली मुद्देमाल 2,35,000 /- रु चा जप्त करण्यात आला. सदर आरोपीकडुन धर्माबाद येथील तीन गुन्हे व पोस्टे उमरी येथील एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
सदरची कामगीरी सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री आविनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्री प्रशांत संपत, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद यांचे. मार्गदर्शनाखाली मा. श्री अभिषेक शिंदे, पोनि सपोनि श्री बालाजी महाजन, सपोउपनि श्री सुदाम आडे पोहेकॉ कुमरे, पोकों सचिन गडपवार, वडजे, दारेबोईनवाड, पोस्टे धर्माबाद यांनी कामगीरी केली आहे.