क्रीडानांदेड

Great Emperor Ashoka Marathon 2025 : सामाजिक समतेचा संदेश देणारी ‘ग्रेट सम्राट अशोका मॅरेथॉन २०२५’ उत्साहात

नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता व एकात्मतेचा संदेश देणारी ‘ग्रेट सम्राट अशोका मॅरेथॉन २०२५’ ही पाचवी स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी ६ वाजता उत्साहात पार पडली.

या उपक्रमाचे आयोजन बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड आणि आंबेडकरी चळवळीचे नेते संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. स्पर्धेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर साहेबराव गायकवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून मुलींच्या गटाच्या मॅरेथॉनला सुरुवात दिली. या स्पर्धेत पुरुष व महिला गटांमध्ये अनुक्रमे ५ कि.मी. आणि ३ कि.मी. अंतराच्या शर्यती घेण्यात आल्या. मराठवाडा परिसरातील शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेत प्रचंड उत्साहाने सामाजिक एकात्मता व निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

ही मॅरेथॉन फक्त धावण्याची स्पर्धा नाही, तर सामाजिक समता, बंधुता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करणारा चळवळीचा एक भाग आहे. तरुणांनी सजगपणे समाजपरिवर्तनात भाग घ्यावा असे आवाहन करत पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात राबवली जाईल आणि नांदेडचेच तरुण विजेते ठरतील असा विश्‍वास साहेबराव गायकवाड यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूख अहेमद, आंबेडकरी भाष्यकार प्रभू सावंत, गुट्टे अकॅडमीच्या संचालिका प्रा. डॉ. आशालता गुट्टे, युवा नेते प्रीतम जोंधळे, बौद्ध धर्म अभ्यासक कवी अतिरत्न वाघमारे, प्रा. इंगोले आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार लखन कारले आणि मिशन ऑफिसर अकॅडमीच्या टीमकडून करण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन आतिश ढगे यांनी केले. या स्पर्धेत महिला गटात ३ कि.मी. धावण्यात परभणी येथील पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. व्दितीय परभणी येथील वर्षा कदम तर तृतीय नांदेड येथील अस्मिता कांबळे हिने पटकावला तर उत्तेजनार्थ वैष्णवी दुधमल, दर्शना वाघमारे यांना देण्यात आले.

पुरूष गटात ५ कि.मी. धावण्यात नाशिक येथील ऋषिकेश वावरे, व्दितीय लातूर येथील निवृत्ती बंडेवार तर पुसद येथील प्रणव राठोड याने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक परभणी येथील योगेश पडके, यवतमाळ येथील सुजित राठोड यांना देण्यात आले. स्पर्धेत प्रथम विजेत्यास ५ हजार रोख व स्मृती चिन्ह, व्दितीय रोख ३ हजार व स्मृती चिन्ह, तृतीय २ हजार व स्मृती चिन्ह तर उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख १ हजार रुपये व स्मृती चिन्ह देवून गौरवीण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी करण गच्चे, आशिष सावंत, सवि दीपके, बंटी जोंधळे, अफरोज भाई, अक्षय पोहरे, सूरज कवडे, अमोल धुतले, अभय चौहान, कृपेश नरवाडे, आकाश शिंदे, श्रेयश निखाते, अजय राऊत (राज गोमस्कर), अतुल भुजबळ, बुद्धम गायकवाड, विकास सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!