लोहा। लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे मंगळवारी बाळू मामांच्या मेंढ्या साठी महाप्रसाद केला होता.त्यात भगर शिजविले त्यातून दोन हजार लोकांना विषबाधा झाली होती.
त्या सर्वांना वेळेत उपचारासाठी लोह्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी पोहण्यासाठी भल्या पहाटे पासून मेहनत घेतली व वेळेवर रुग्णालयात पोहचविले त्या बद्दल त्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते एका दैनिकाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांची विशेष उपस्थिती होती.
उत्कृष्ट कार्य पुरस्काराने श्रीब चिंचोलकर याना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमल किशोर कदम, महापालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, संपादक रवींद्र तहेकिक, डॉ.गणेश जोशी उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार . एल ए हिरे याना पुरस्कार प्रदान करण्यात आला.