नायगाव। बरबडा येथील जमीलखान शादुलखान पठाण हा युवक दोन महिन्यांपूर्वी घरातून आता येतो म्हणून दुचाकीवर बसून गेला तो आजपर्यंत परत आलाच नाही यामुळे त्यांचे छोटे भाऊ अजीसखान पठाण हे कुंटूर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज दाखल करून घातपात असल्याची शंका व्यक्त केली परंतु अजूनही सदर प्रकरणाचा तपास लागला नाही यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी पठाण कुटुंबाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
सदर वृत्त असे की,बरबडा येथील जमीलखान शादुलखान पठाण हे दि.०२ डिसेंबर २०२३ च्या रात्री घरातून ११:३० वा.बाहेर जावून येतो दुचाकीवरून घरातून गेला तो आजपर्यंत परत आलाच नाही यामुळे त्यांचे छोटे भाऊ अजीसखान पठाण यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज दाखल करून मिसींगची तक्रार केली परंतु अजूनही सदर प्रकरणाचा तपास लागला नाही यामुळे जमीलखान पठाण यांचा अपहरण करून घातपात झाला असावा अशी शंका व्यक्त करत अजीसखान पठाण यांनी काही नावे उघड केली आहे.
यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून पठाण कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली असून बेपत्ता असलेल्या जमीलखान पठाण यांचे वर्णन -वय ३३ वर्ष, उंची ५ फुट ६ इंच,रंग सावळा, बांधा-सडपातळ, पायात काळ्या रंगाची चप्पल,पोशाख – निळ्या रंगाचा जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाची टिसर्ट असे असून कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने शोध पत्रकाही काढण्यात आली आहेब सदर इसम कुठे आढळून आल्यास कुंटूर पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.