
नांदेड| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (लिखा) शाळेतील विद्यार्थीनी कु. दुर्गा राजेश मोरे हिचा छ. शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत ‘छ. राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य’ या विषयावर लिहिलेल्या अभ्यासपूर्ण निबंधास उत्तेजनार्थ पारितोषिक आणि मुख्य शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
सदर विद्यार्थीनीस सांस्कृतिक विभाग प्रमुख मारोती कदम, वर्गशिक्षक तानाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर पारितोषिक प्राप्त विद्यार्थीनी दुर्गा मोरे हिचा शाळेत पालकासह सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल रिठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण मोरे, केंद्रप्रमुख उमाकांत देशटवार, त्र्यंबक उदबुके, ज्ञानोबा विटकर, संजय कदम, संगिता भोळे, शंकर मेंगावार, जयश्री अंबोरे आदींनी अभिनंदपर शुभेच्छा दिल्या आहेत.
