हिमायतनगर। तालुक्यात पळसपूर, घारापूर या भागात विद्युत पोल उभारणीचे काम चालू असून, सदरील कामे ही अल्प मटरियलचा वापर करूण अतिशय निकृष्ट दर्जाचे काम उरकण्यात येत असून अवघ्या काहींच दिवसात या निकृष्ट दर्जाच्या कामाचे बिंग फूटणार असून, या निकृष्ट दर्जाच्या कामाला पाठबळ पुरविणाऱ्या संबंधित विद्युत महावितरण कंपनीच्या अभियंत्यांवर कारवाई करुन कामे दीर्घकालीन टिकणारी व तसेच दर्जेदार करावी. अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालूका अध्यक्ष दत्ता शिराणे यांनी केली आहे.
तालुक्यातील पळसपूर, घारापूर रोडवर चालू असलेले काम पोलची साईज ४ × ६ असून पोल कमजोर फॅब्रिकेशन वापर करूण लेबरलाही अडचणीत आणण्याचे काम होत आहे. परिणामी एखादा अपघात ही होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. व तसेच विकास कर पाॅइंन्ट ब्रॅकेट एॅगल पोल टू स्ट्रक्चर नसून त्या ठिकाणी सिग्नल पोलवर भागवा भागवी करूण सुधारित पद्धतीने निधी लाटण्याचा गुत्तेदाराचा डाव असून लाईन मध्ये कुठलाही पोल एका लाईन मध्ये उभा नाही. जशी जागा भेटेल तसा पोल उभा करून काम पळविण्यात येत आहे.
या लाईनचे काम दोन वर्ष ही टिकेल याची शाश्वती देता येणार नाही. विशेषकरून पोल उभा करण्यासाठी खड्डा २ × २ खोली ६ फूट असे न करता ३ फूट खोल बोअरचा होल वर पोल उभा करून एक लाईन मध्ये पोल उभा न करता जागा भेटेल तेथे पोल उभे करण्यात आले आहेत. या कामांसाठी पि. डब्ल्यू डी ची कुठलीही परवानगी न घेता रस्त्यालगत खांबे उभारणी केली. तेच पुल रस्ता रुंदीकरण झाल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात पोल टाकून त्या जागेचा मोबदला एम. एस. ई. बी. ने कधीच दिला ही नाही. तरी या लाईनी सोबत शेतकऱ्यांचा काही संबंध नाही. सदरचे काम रस्त्याच्या हद्दीत करू नये म्हणून बांधकाम विभागाने आदेश संबंधित ठेकेदार व कंपनीला दिलेले आहेत.
बांधकाम विभागाचा आदेश झुगारून इन्फ्रा एजन्सी काम करीत आहे. भविष्यात हा रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा त्रास होण्याची संभावना आहे. विशेषत्वाने ही लाईन शेतकऱ्यांसाठी नसून गावठाण फिटर आहे. या लाईनचा आणी शेतकऱ्यांचा संबंध नाही. मग विनाकारण शेतकऱ्यांना त्रास का? म्हणून या सर्व निकृष्ट व शासनाच्या सर्व नियमाला बगल देऊन होत असलेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. अशी मागणी भाजपचे दत्ता शिराणे यांनी केली आहे.