श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पथकासोबत माहूर पोलिसांना तालुक्यातील मौजे हडसनी येथे ताज पत्ते जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जुगार अड्यावर संयुक्तपणे धाड टाकून 8 जनावर गुन्हा दाखल करत मुद्देमाला सह रोख 2050 रुपये जप्त केल्याची घटना दि 26 7 2025 अर्ध्या रात्री 12.15 वाजता घडल्याने जुगार अड्डे चालविणारे आणि जुगार खेळणाऱ्यात दहशत पसरली आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाह्या करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली असून सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय करणाऱ्यावर जबर कारवाया करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर तालुक्यातील अनेक दारूचे अड्डे उध्वस्त केले.
माहिती मिळताच दारू विकणाऱ्यावर धाडसी कारवाया करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी गोपनीय माहिती द्वारे जुगार अड्डे चालत असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली असून, अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांचे चे संचालन काही महिला द्वारे होत असल्याने माहूर पोलीसाकडून सतर्कता अंतर्गत वरिष्ठ कार्यालयाच्या पथकाला पाचारण करून कार्यवाही करत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यात दहशत पसरली आहे.
माहूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पाऊस सुरू असून बिबट्या अस्वल सह इतर जंगली जनावरांची दहशत कायम असताना गुप्त माहिती मिळाल्याने माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कार्यालयाच्या पथकाने जीव धोक्यात घालत मोटरसायकल वरून मौजे हडसनी येथे भर पावसात रात्रीला जगजीवन शिंदे यांचे जनावरांचे कोठ्या मध्ये ताज पत्ते जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड, पोलीस अधीक्षक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ए.वि.डाके पो का. सोनटक्के, अमोल राठोड यांनी सदर ठिकाणी जाऊन ताजपत्ते जुगार खेळणाऱ्यां 8 जणांना रंगेहात पकडले व त्यांच्यावर पोलीस ठाणे माहूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच जुगार खेळण्याचे साहित्य आणि 2050 रुपये जप्त करण्यात आले आहेत.