उस्माननगर, माणिक भिसे। आयुष मंत्रालय भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच विविध कार्यशाळा , शिबिरे, वृत्तपत्रांमधून लिखाण, आकाशवाणीवर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणाऱ्या डॉक्टरांना प्रतिष्ठेचा मानणारा आयुर्वेद चिकित्सक हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा आयुर्वेद चिकित्सक हा पुरस्कार निवघेकर आयुर्वेद हॉस्पिटल नांदेड च्या संचालिका डॉ. सुरेखा विश्वंभर पवार निवघेकर यांना देण्यात आला आहे.
दि.१९/०१/ २०२४ रोजी ठाणे येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नामदार श्रीपादजी नाईक ,केंद्रीय सचिव राजेश कोटेचा व केंद्रीय सचिव अहुजा मॅडम ,केंद्रीय आयुर्वेद अध्यक्ष मा. देवेंद्र त्रिगुणा सर ,आयुष मंत्रालयातील मनोज नेसरी ,राकेश शर्मा ,जयवंत देवपूजारी सर , चेअरमन सी. आय.एस.एम तसेच डॉ. रामदास आव्हाड सर यांच्या हस्ते डॉ.सुरेखा पवार यांना आयुर्वेदिक चिकीत्सक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या निवडीबद्दल समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती मुद्रिकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड व संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोतीराव पाटील घोरबांड आणि नैतिक मारोतीराव पाटील घोरबांड, प्रतिक मारोतीराव पाटील घोरबांड यांनी अभिनंदन केले आहे.तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सर्वत्र त्यांचे कौतुका बरोबरच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.