नांदेड| डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे दिमाखदार व दर्जेदार सूत्रसंचलन, पं.धनंजय जोशी व प्रख्यात गायिका राजश्री ओक यांनी ताकदीने सादर केलेली भक्ती-भाव-नाट्यगिते उत्कृष्ट साथसंगत यामुळे दिवाळी पहाट-२०२३ च्या भक्तीचा भाव घाट या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गोदावरीच्या बंदाघाट आज रसिक-प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत होता.

जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या वतीने नांदेडच्या गोदा तिरावर बंदाघाट येथे आजपासून दिवाळी पहाट-२०२३ ला प्रारंभ झाला. १५ नोव्हेंबरपर्यंत गित संगीत व नृत्याच्या तसेच कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन या अंतर्गत करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुव्दारा बोर्डाच्या वतीने शबद सादर करण्यात आले. आज प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या संकल्पनेतून भक्तीचा भाव घाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

खुमासदार व दर्जेदार निवेदनामुळे डॉ.नंदकुमार मुलमुले यांनी रसिकांना जागेवरच खिळवून ठेवले. वेगवेगळ्या उदाहरणासह तसेच जुन्या पिढीतील वेगवेगळ्या चालीरिती व एैतिहासिक पार्श्वभूमी सांगत त्यांनी या कार्यक्रमावर वेगळाच प्रभाव पाडला. प्रख्यात धनंजय जोशी आणि प्रख्यात गायिका राजश्री ओक यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस रचनामुळे नांदेडचे रसिक मंत्रमुग्ध झाले. भक्तीसंगीत, नाट्यसंगीत, भावगिते व लावणी अशा विविध गितांचा सुरेख मिलाप या कार्यक्रमातून नांदेडच्या रसिकांना झाला. भल्या पहाटे साडेपाच वाजताच रसिकांची झालेली गर्दी ही वाखाणण्याजोगी होती. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे दिपप्रज्वलन करुन केले. नागरी सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

प्रख्यात धनंजय जोशी यांनी गायिलेल्या अलबेला सजन आयो-तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल (बंदीश), अबिर गुलाल उधळीत रंग, मर्म बंधातली ठेव ही, बाजे रे मुरलीया बाजे रे….संत भार पंढरीत, श्रीपाद वल्लभ दिगंबरा (स्व.अण्णासाहेब गुंजकर यांची रचना), रामनाम ज्याचे मुखी (भैरवी) या रचनामुळे व दर्जेदार गितांमुळे रसिक भारावून गेले. शास्त्रीय संगीताचा जबरदस्त अभ्यास आणि त्यावर असलेली पकड हे आजच्या धनंजय जोशींच्या गायनाचे वैशिष्ट्ये होते. तर प्रख्यात गायिका राजश्री ओक हिने जीवनात ही घडी, र्‍हदयी प्रित जागते, कारे दुरावा कारे अबोला, माझी रेणूका माऊली, राजसा जवळ जरा बसा, ही गिते सादर करुन अनेक वर्षानंतर नांदेडची हि मैफल तिने बहारदार केली. राजश्री ओक हिने सादर केलेल्या सर्वच रचना रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या होत्या. या कार्यक्रमास साथसंगत तबल्यावर प्रशांत गाजरे, मृदंग-विश्वेश्वर जोशी, हार्मोनियम-मिहिर जोशी, साईड र्‍हीदम-भगवानराव देशमुख यांनी संगीतसाथ केली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version