
नांदेड। विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला या मृत्यू तांडवाची तात्काळ राज्याच्या मुख्यमंत्री यांनी चौकशी करून संबंधितावर तात्काळ कार्यवाही करावी व दवाखान्यासाठी आवश्यक त्या सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा नांदेड जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनातून निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस. आर.वाकोडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्नाटक,तेलंगणा व मराठवाड्यातील जवळपास पाच जिल्ह्यातून सामान्य व गरीब कुटुंबातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात परंतू, दवाखान्यात औषधाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे वेळेवर रुणाला औषधी उपलब्ध होत नाहीत शासनाच्या दिरंगाईमुळे अपुऱ्या नर्सेस व डॉक्टरचा स्टॉप असल्यामुळे रुणांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे दवाखान्यात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे हि बाब अतिशय गंभीर व निषेधार्थ असून अजून ७० रुग्ण मृत्यूची झुंज देत आहेत.
शासनाच्या दुर्लक्ष पणामुळे दवाखान्यात प्रचंड मृत्यूचे तांडव चालू असून याची संपूर्ण चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी व त्वरित दवाखान्याला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरुणकर,महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर ,रमेश गांजापुरकर,चंपत हातांगळे, प्रकाश मांजरमकर,विश्वंभर भोसीकर, मीनाताई पेठवडज कर, रामदास पाटील जाधव अभिजीत मुळे,डॉ. मुजाहिद खान ,प्रा.मजरुद्दीन, सुभाष रावणगावकर इत्यादीने निवेदनाद्वारे केली आहे.
