
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नरसी येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाच्या साहित्यिक मंडळाचे तात्कालीन सदस्य वैकुंठवासी भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यानाचे व स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक 24. नोव्हेंबर 2023 रोजी आदित्य गार्डन नरसी येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार हे होते. तर या स्मृती पुरस्कार सोहळ्याला मोठया प्रमाणात परिसरातील वैकुंठवाशी भगवानराव पाटील भिलवंडे यांना मानणारा वर्ग मोठया प्रमाणात होता. या कार्यक्रमात विविध शेत्रात लोकप्रिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला आहे. नरसी तालुका नायगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाचे तात्कालीन साहित्यिक मंडळाचे सदस्य वैकुंठवासी भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले आहे.
वैकुंठवासी भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या स्मृती पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सर यांना साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे तसेच सामाजिक पुरस्कार डॉक्टर दिलीप पुंडे यांना देण्यात आला आहे तसेच राजकीय पुरस्कार नागोराव रोशनगावकर यांना देण्यात आला आहे. कृषी पुरस्कार श्री उमाकांत देशपांडे नावंदीकर यांना देण्यात आला आहे. सांस्कृतिक पुरस्कार शाहीर दिगू तुमवाड यांना देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार साहेब होते.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रकाश भगवानराव पाटील भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर भिलवंडे, राजेश भगवानराव भिलवंडे, माधवी जगन्नाथ शेळके, रेखा श्रीहरी काळे यांनी केले होते. या वैकुंठवासी भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्या ला नरसी येथील दत्त मंदिर चे गुरुवर्य दिगांबर महाराज बोळसेकर, हानवटे साहेब,संभाजी पाटील भिलवंडे,राजू गंदीगुडे, नरसी चे पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, भाजपचे तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे, आधी मान्यवरांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
