नांदेड| दिवाळीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे चिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सफाई कामगार महिलांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते साडी- चोळीचे वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे चिटणीस तथा खासदार चिखलीकर यांचे खंदे समर्थक क्षिति जाधव यांच्या वतीने भगीरथ नगर येथील महादेव मंदिरात दिवाळीनिमित्त सफाई कामगार महिलांना साडी चोळी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महिला कामगारांना साडी- चोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख,पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सचिन उमरेकर, संजय अंभोरे, अमोलसिंग हजारी, गौरव जाधव, व्यंकट गोखले, मनोज जाधव, मंडळ अध्यक्ष पुष्पाताई वानखेडे, सविताताई जाधव, खिलारेताई, कांबळेताई, छाया गायकवाड, अनिता कांबळे, चव्हाणताई आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा चिटणीस क्षितीज जाधव दिवाळी तसेच महापुरुषांच्या जयंती व नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कपाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास वडजे, उत्तम तिडके, विजय जाधव, विनोद पवार, कार्तिक सरोदे, प्रताप पावडे, गणेश शिंदे, विकी चव्हाण, कुणाल सावते, संतोष गवळी, पप्पू कोल्हे, प्रफुल कांबळे, परमजीतसिंग बावरी, विशाल स्वामी, योगेश पुंडगे गोविंद कोंडके, अजय कंधारे, अभिजीत पाईकराव, मयूर गुजरवार, राजू मानेकर यांनी परिश्रम घेतले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version