नांदेड| माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे भोकर विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष असून त्याचाच एक भाग म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघातील 41 ग्रामपंचायतींना 21 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेतला असून या मंजूरीचे पत्र थेट ग्रामस्थांना भाजपच्या युवानेत्या श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते आज येथे प्रदान करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदार संघासाठी मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत 16 कोटी रुपये तर महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला आहे. भाजपाच्या युवानेत्या श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते मतदार संघातील 41 गावांना या निधी मंजूरीचे पत्र वितरण करण्यात आले. यावेळी माजी सभापती किशोर स्वामी, माजी सभापती जगदिश पाटील भोसीकर, बाळासाहेब देशमुख बारडकर, भगवानराव दंडवे, बालाजी गव्हाणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
निधी मंजूरीचे पत्र मिळालेल्या गावांमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातील जांभळी, धावरी खु.तांडा, पाकी, धारजनी, कुदळा तांडा, नारवट, नांदा, बेंद्री, सोमठाणा, सायाळ, खडकी, बोरगाव, गारगोटवाडी, चितगिरी, हाळदा, बोरवाडी, शंखतीर्थ, वासरी, शिखाची वाडी, हिस्सा पाथरड, बोरगाव, वैजापूर पार्डी, पांगरगाव, बोरगाव ना., वाडी मुखत्यार, सरेगाव, सावरगाव, चैनापूर, लोण खु., दाभड, मेंढला.बु., कामठा बु., उमरी, शहापूर, बेलसर, निजापूर वाडी आदी गावांचा समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आ.अमिताताई चव्हाण यांचे भोकर विधानसभा मतदार संघातील नागरिकांशी “आम्ही तुमचे आणि तुम्ही आमचे” असे नाते राहिले आहे. हे नाते अधिक घट्ट करण्याचे काम तिसऱ्या पिढीमध्ये आपण करणार असल्याची ग्वाही भाजपाच्या युवानेत्या श्रीजयाताई चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
पत्र घेणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुदाम आडे, मोहन राठोड, गोविंद राठोड, बालाजी राठोड, सदाशिव डोकले, संतोष चव्हाण, उत्तम राठोड, ज्ञानेश्वर गोदेवाड, सुमेश फुगले, नामदेव तेलंगे, दिलीप रायभाडे, रामराव सूर्यवंशी, रमेश चव्हाण, चंद्रकांत नागमोड, राजू बुलबुले, सुदाम कोठूळे, मारोती शंखतीर्थकर, पप्पू पाटील खानसोळे, साहेबराव खानसोळे, गणेश कदम, गणपती कदम, सुदाम भोसले, विलास लोकरे, श्यामराव धबडगे, मुखत्यार शेख, संतोष गाडे, नामदेव चव्हाण, प्रकाश गाडे, राजेश चव्हाण, आदेश गाडे, सुनिता कदम, मल्हारी बलोड, दत्तराव देशमुख, अशोक देशमुख, गोविंद देशमुख, जीवन कळणे, बालाजी गिरे, संभाजी पांचाळ,विजय जाधव, गणेश राठोड, उत्तम महागाडे, चंद्रमुनी लोणे, राजेश लोणे, स्वप्नील टेकाळे, रघुनाथ भरकड, प्रल्हाद पवार, विजय भुसे, अतुल लोणे, हरदिपसिंघ कामठेकर, विठू पाटील, सदाशिव पाटील, साहेबराव गव्हाणे, शिवदास दासे, शिवलिंग स्वामी, परमेश्वर ढवळे,सूर्यकांत गुंडले, राजाराम पवार, साहेबराव सोळंके, रमेश क्षीरसागर, पांडूरंग क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर, बबन ढगे, बालाजी कदम आदी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्यांचा समावेश होता.