नांदेडमध्ये ” लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई ” ठरली वरदान
नांदेड। शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे तळपत्या उन्हात हंडाभर पाणी मिळवण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असतांना शिवशक्तीनगर, धम्म नगर व मिल रोड भागातील नागरिकांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे गेल्या २२ वर्षीपासून उन्हाळ्यात सुरू असलेली ” लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई ” वरदान ठरली असून स्वतः दिलीप ठाकूर हे दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास पाणी वाटप करत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे.
मीलरोड भागातील नागरिकांसाठी व वाघी नाळेश्वर सर्कल मधील १६ गावाच्या प्रवाशांसाठी उन्हाळ्यात पाणपोईचे आयोजन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप ठाकूर हे दरवर्षी करत असतात. यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे पाणपोईचे औपचारिक उद्घाटन न करताच पाणपोई सुरू करण्यात आली. लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे , मातोश्री कै. वनमाला ठाकूर, कै. ॲड. श्याम जाधव, कै. बिरजू यादव, कै.लक्ष्मीबाई भुसेवाड यांच्या प्रतिमा पानपोई वर लावण्यात आल्या आहेत.
तहानलेल्याला थंड पाणी मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मा संतुष्ट होऊन मनातून दुवा मिळतो.गरजूना अन्नदान, उन्हाळ्यात पाणपोई तसेच अनवाणी चालणाऱ्यासाठी चप्पल पुरविण्याची चरणसेवा, पावसाळ्यात छत्री वाटपाचा कृपाछत्र उपक्रम तसेच हिवाळ्यात थंडीत कुडकुडणाऱ्यांच्या अंगावर मध्यरात्री ब्लॅंकेट पांघरून देण्यात आलेली मायेची उब या सारखे तिन्ही ऋतूत चालणारे उपक्रम फक्त दिलीप ठाकूर हेच राबवितात. नगरसेवक असताना दिलीप ठाकूर यांनी सुरू केलेला पाणपोईचा उपक्रम पद गेल्यानंतरही सातत्याने चालू ठेवला आहे.
त्यांच्या पत्नी सौ जयश्री दिलीपसिंह ठाकूर ह्या नगरसेविका असताना त्यांच्या स्वेच्छा निधीतून विंधन विहीर घेऊन त्यावर विद्युत मोटर बसविण्यात आली होती. दरवर्षी दिलीप ठाकूर हे स्वखर्चातून विंधन विहिरीची दुरुस्ती व नवीन राजंनाची व्यवस्था करतात. कडक उन्हात देखील या विंधन विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे दररोज सकाळी साडेसात ते साडेनऊ व सायंकाळी साडेपाच ते साडेसात यादरम्यान दिलीप ठाकूर हे स्वतः उभे राहून पाण्याची व्यवस्था करून देतात. या भागातील नागरिक शिस्तीत रांगा लावून पाणी भरतात. आपत्कालीन परिस्थितीत दिलीप ठाकूर यांच्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.