धर्म-अध्यात्मनांदेड

वाढोण्याच्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिरास मनोकामना पूर्ण झाल्याने भक्ताकडून सोन्याचा गणपति प्रतिमा दान

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) शहराच्या हाकेच्या अंतरावर   असलेल्या पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची निमित्ती होऊन अनेक वर्ष झाली, येथील समीतिकडून मंदिराच्या सौंदर्यत भर टाकण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. त्यामुळे मंदिराची ख्याति दिवसेदिवस वाढू लागली आहे. वरद विनयकाच्या दर्शनाने पूर्ण झालेली मनोकामना करणाऱ्या भक्तांची भावना अधिक दृढ़ होत असल्याचे जिवंत उदाहारण संकष्ट चतुर्थिला समोर आले आहे. एका सद्भक्ताने एक आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर सोन्याचा गणपतीची प्रतिमा मंदिर समीतिकडे सुपुर्द केलि आहे.

वाढोणा शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर निसर्ग निर्मित्त पांडवकालीन युगातील कनकेश्वर तलाव आहे. सध्याच्या हिमायतनगर शहराचे नाव त्याकाळी वारणावती होते. पांडवानी या तलावाला ओमचा आकार दिला आणि द्रोपदीने तलावात शुभ्र कमळाचे फुलं लाऊन मंदिर परिसराला सजविल्याची अख्याइका सांगितली जाते. याचं पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती वरद विनायक गणपतीचे मंदिर चंद्राच्या बिंबावर वसलेले आहे. कालांतराने या ठिकाणी गौंड राज्याचे राज्य अस्तित्वात आले, त्या राजाने वारणावती शहराचे नाव बदलून वाढोणा ठेवले. राजे शामबहादूर यांनी वाढोणा शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला होता. ते याच ठिकाणी राहून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहत शेतसारा वसूल करत असे. कालांतराने निजामशाही राजवटी सुरु झाली. त्या काळात हिमायतअली नावाचा सरदार वाढोणा जिल्ह्याला भेट देण्यासाठी आला होता. सर्व जाती – धर्माच्या लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर खुश होऊन हिमायतअली राजाने हिंदू – मुस्लिम समाजासाठी शेतीच्या स्वरूपात भव्य नजराणा बहाल केला. सरदार च्या उपकाराची परतफेड म्हणून हिमायतअली नावाचे नामांतर करून वाढोणा शहराला हिमायतनगर नाव देण्यात आले. तेंव्हाच वाढोणा आज हिमायतनगर नावाने ओळखले जाते आहे.

निजामाच्या राजवटीत या तलवानजीक असलेल्या शिवमंदिरासह अन्य मंदिराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्या पासून मूर्तीचे रक्षण करण्यासठी येथील काही लोकांनी वरद विनायकाची मूर्ती लिंबाच्या झाडा खालील कंबरे इतक्या खोल खड्यात जपून ठेवली होती. तीच वरद विनायकाची मूर्ती तब्बल दीडशे वर्षानंतर याच अवस्थेत उन, वारा, पावसाचा अनुभव घेत राहिली. सण १९७८ ला तत्कालीन अवतारी पुरुष श्री संत पाचलेगावकर महाराज यांनी हिमायतनगर शहराला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कनकेश्वर तलावासह मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यावेळी गावातील गणेशभक्त व परिसरातील शेतकर्यांनी श्रमदान केले. गुरुवर्य लाखने महाराज, कांतागुरु आजेगावकर, यांच्या पुढाकारातून मंदिर बांधकामाची सुरुवात करण्यात आली. यासाठी येथील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव काळात केला जाणारा अनधिकृत खर्च टाळून उर्वरित रक्कम, लोकवर्गणी व मजुरीचे पैसे वाचवत वरद विनायकाचे मंदिर उभे केले. उंच टेकडीवरील मंदिरात अष्टभुजाधारी इच्छापूर्ती वरद विनायकाची विशाल मूर्ती मोठ्या कसोटीने नेण्यात येउन, विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आज हि मूर्ती सर्वाना आशीर्वाद देत असून, गणेश उत्सव पर्व काळात या ठिकाणी गणेश मूर्तीची पूजा- अर्चना महाभिषेक, महाप्रसादाच्या पंगती केल्या जातात. आज पंचमीला शहरातील वरद कृषि सेवा केंद्राचे संचालक राम पाकलवार व संसार कलेक्शन नितेश जयस्वाल यांच्यातर्फे पंगत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील वरद विनायक मंदिर व् कनकेश्वर महादेवाचे मंदिर परिसराचा कायापलट व्हावा यासाठी भास्कर चिंतावर, शान्तीलाल सेठ आदींसह त्यांचे सहकारी शहरातील गणेशभक्त देणगीदारांची सहकार्यातून दि.२४ एप्रिल रोजी श्री कनकेश्वर महादेव मंदिर आणि श्री वरद विनायक गणपती मंदिराचा कलशारोहन थाटात संपन्न झाला. आता जूनि परम्परा कायम ठेवण्यासाठी वर्षभरत येणाऱ्या चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीच्या पंगतीचे अन्नदाते तयार झाले असून, त्यांची यादि मंदिर समितिने लावली आहे. तसेच वर्षभर येथील श्री वरद विनायक मंदिरात अभिषेक होणार आहेत. ज्या गणेशभक्ताना अभिषेक करावयाचा त्यानी आपली नावे मंदिर समीतिकडे देऊन अभिषेक करावा अस आवाहन मंदिराचे पुजारी परमेश्वर बडवे यांच्या वतीने करण्यात आल आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!