करियरनांदेड

डोंगरगावचे देवानंद सुकापूरे यांची CRPFमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

गावात आनंदाचे वातावरण; ग्रामस्थांकडून अभिनंदनांचा वर्षाव...!

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील डोंगरगाव या छोट्याशा गावाचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे. गावाचा सुपुत्र देवानंद सुकापूरे यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) या पदावर पदोन्नती मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे डोंगरगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

देवानंद सुकापूरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व मेहनतीने आपली सेवा बजावत देशातील विविध ठिकाणी – असम, दिल्ली, नागपूर, जम्मू-काश्मीर, श्रीनगर, छत्तीसगड व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट येथे जबाबदारी सांभाळली. कर्तव्यनिष्ठा, शिस्त व प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांना यापूर्वी हवालदार पदावर पदोन्नती मिळाली होती. आता त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाने सन्मानित करण्यात आले आहे. दि. २० जून २०२५ रोजी CRPF कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पदोन्नतीचे पत्र प्रदान करण्यात आले. या वेळी त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या यशामुळे डोंगरगावमध्ये उत्सवाचे वातावरण असून सरपंच दिगंबर निळे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान निळे, शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे सदस्य पंडित घुन्नर, माजी सदस्य भीमराव मुलगीर, राजेश घुन्नर, मारोती मुलगीर, मुख्याध्यापक दत्ता तुरनर, शिक्षक अनंता तुरनर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर गोदगिरे, शेतकरी प्रतिनिधी रमेश मुलगीर, प्रकाश मुलगीर, साईनाथ निळे, प्रदीप मुलगीर, प्रदीप भुसनर, भारत घुन्नर, कैलास वाढवे, यादव सुकापूरे, देवानंद मिसाळ, अत्रीनंदन मुलगीर सर, प्रा. गजानन मिजगार सर, प्रा. गजानन गिरी, निरंजन दहेकर, दिनकर शिंदे, बाबाराव कुंभकर्ण, देवबा पाटील, प्रल्हाद माने तसेच इतर ग्रामस्थ व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. देवानंद सुकापूरे यांच्या या यशामुळे तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!