हिमायतनगर| शहरातील शिपाई मोहल्ला भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर याच ठिकाणच्या एका नागरिकांनी घराचे बांधकाम केले असून, बांधकाम करताना थेट सार्वजनिक रास्ता व विहिरीवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आम्हा नागरिकांना नाहक त्रास करावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ सार्वजनिक विहीर आणि रास्ता मोकळा करून देऊन अतिक्रमणामुळे होणारी अडचण दूर करावी अशी मागणी वॉर्ड क्रमांक ९ मधील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे कार्यालयीन अधीक्षक श्री महाजन केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर विविध भागात व रत्स्यावर थेट अतिक्रमण केले जात आहे. एव्हढेच नाहीतर नगरपंचायतीच्या जबाबदार अधिकाऱ्याकडून परस्पर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना देखील सार्वजनिक मालमत्ता जो मर्जी सांभाळेल अश्यांच्या नावाने करून देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मागील काळात असे अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर शहरातील नागरिक जागरूक झाले आहेत. असाच प्रकार आता हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 9 मध्ये माहिती अधिकारातून काढण्यात आलेल्या कागदपत्रान्वये उघडकीस आला आहे.
याच भागातील एका नागरिकांनी खरेदी केलेल्या जागेवर बांधकाम केले आहे. मात्र यात नगरपंचायतच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून चक्क सार्वजनिक विहिर आणि रत्स्यावर बांधकाम करून अतिक्रमण केले असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. वार्ड क्रमांक 9 मध्ये येणाऱ्या गुजरी चौकातून शिपाई मोहल्ल्याकडे जाणाऱ्या रस्ता आहे. याचा रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक विहीर आणि रस्त्यावर मोकळा करून देण्यास येणाऱ्या परिसरात असलेल्या सार्वजनिक विहीर व रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे आम्हा नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता येतील सार्वजनिक रस्ता व विहीर मोकळी करून द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी नगरपंचायतीला निवेदन देऊन केली आहे.
या रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, सध्या उन्हळाच्या झाला सहन कराव्या लागत आहेत. याबाबत बांधकाम केल्यास विचारणा केली तर धमक्या देत आहेत. हि बाब लक्षात घेता तात्काळ करण्यात आलेले अतिक्रमण हटवून देऊन रस्ता व विहीर मोकळी करून द्यावी आणि विहिरीला असलेले पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वॉर्ड क्रमांक ९ मधील सलीम शेख अहमद खाजी हुसेन, रमेश वामनराव गव्हाणे, डॉक्टर अशोक उमरेकर, बालाजी अंबादास बिल्लेवाड, गिरजाबाई बाबुराव शिंदे, नरेश संजय शिंदे, कांचन बंडेवार, डॉक्टर मामीडवार, नवीन नवलचंद पिंचा, अब्दुल नायूं खजी हुसेन, रूपाली श्रीनिवास बंडेवार, मिर्झा एजाज बेग, अनिल अशोक शिंदे, सचिन कोंडबाराव शिंदे, शेख असलम शेख फरीद, मुनवर खान, शेख इरफान शेख इब्राहिम, मिर्झा अजर बेग, अजहार खान महबूब खान, महेबूब खान मौला खान, फसीउद्दिन अल्लाउद्दीन खान, मिर्झा अमीर बेग, गजानन शिवराम अंजनीकर, जिलाल अहमद, अब्दुल जब्बार अब्दुल रहीम, शेख निसार शेख हुसेन, किफायत खान, सय्यद गफार सय्यद महबूब, शिराज खान हमीद खान, आदींसह वार्ड क्रमांक 9 मधील परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.