श्रीक्षेत्र माहूर,इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ येथील शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले करिश्मा 27 के जी व्ही आय जी ओ टी कंपनीच्या दोन बॅग व सोया 9305 टी/वन बुस्टर 30 के जि बुस्टर व्ही ट कंपनीच्या दोन बॅग ची उगवण शक्ती झाली नसल्याने कंपनीने माझे अतोनात नुकसान केल्या प्रकरणी या कंपनीवर कायदेशीर कारवाई करूननुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार मुगाची काकडे यांच्याकडे प्रदीप जमदाडे यांनी केली आहे

मौजे गुंडवळ येथील रेखाबाई भीमराव जमदाडे वर्षे 60 यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मी माझी वडिलोपार्जीत शेती करून माझे व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असते. मी अनुसूचित जाती मधील बौद्ध समाजाची एक विधवा शेतकरी आहे.माझे शेत मौजे गुंडवळ ता. माहूर येथे असून शेत सर्वे न. 66 व 67 मध्ये मी वर नमूद केलेल्या करिश्मा 27 केजी व्हीआय जिओ टी कंपनीच्या दोन बॅग व सोया 9305 टी वन बुस्टर 30 के जी बुस्टर व्हीट कंपनीच्या दोन बॅग ची पेरणी दि. 25/06/2025 रोजी केली असून मला प्रतीबॅगला रु.6000/- खर्च आलेला आहे. या बियाण्याची उगवणशक्ती 20 टक्के झाली असून माझे कधीही न भरून निघणारे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे व मला दुबार पेरणी करण्याची पाळी येण्याचे संकट आले आहे.

तेव्हा मेहरबान साहेबांनी वरील दिलेल्या कंपनीवर तात्काळ कारवाई करून मी करिश्मा 27 के जी व्ही आय जी ओ टी कंपनीच्या दोन बॅग व सोया 9305 टी वन बुस्टर 30 कें जीं बुस्टर व्हिट कंपनीच्या दोन बॅग ची उगवण शक्ती झाली नसल्याने कंपनीने माझे अतोनात नुकसान केल्या प्रकरणी या कंपनीवर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा व मला माझी झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी ही नम्र विनंती. अशी मागणी केल्याने तालुक्यात विक्री झालेल्या बोगस बियाण्यांची उगवणच झाली नसल्याने सदरील बियाणे अनेक शेतकऱ्यांनी घेतल्याने त्यांचीही तीच अवस्था झाल्याची शक्यता नाकारता येत असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ तालुक्यातील शेत शिवारात केलेल्या बियाण्यांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे

